Mining  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील खाणप्रश्‍नी सकारात्मक तोडगा काढा; सेसा कामगारांची मागणी

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी कामगार संघटनेचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कामगारांच्या भवितव्याचा विचार करून खाणी सुरू होईपर्यंत दिलासादायक ‘सुवर्णमध्य’ काढावा, अशी मागणी डिचोलीतील (Bicholim) सेसा कामगार संघटनेने केली आहे.डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि सेसा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक बुधवारी डिचोलीत झाली. (Find a positive solution to the mining problem in Goa Demand for Sesa workers)

आमदार भवनात झालेल्या या बैठकीस कामगारांचे सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, दीपक पोपकर, अनिल सालेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. खाणबंदीमुळे कामगार आर्थिक संकटात आले आहेत, अशी कैफियत कामगार संघटनेने आमदारांसमोर मांडली. खाणी सुरू होईपर्यंत पूर्ण वेतन मिळावे. कामगारांच्या हितासाठी सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी कामगारांचे सल्लागार ॲड. प्रभुगावकर यांनी केली. यावेळी कामगार संघटनेने दोन्ही आमदारांना निवेदन सादर केले.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी कामगार संघटनेचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत खाण खात्याच्या संचालकांसोबत कामगार संघटनेची संयुक्त बैठक घेऊन ‘सुवर्णमध्य’ काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदारांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT