Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: अखेर 'त्यांच्या' लढ्याला मिळाले यश, मुख्य आरोपींसह 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव पोलिसांनी अवघ्‍या पाच तासांत केला गुन्हा नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case आपल्या डोळ्यांदेखत जमीन हडप केलेल्या गुन्हेगारांवर गुन्हा नोंद करावा यासाठी मागची अडीच वर्षे ‘कुणी केस नोंद करून घेता का हो केस’ असे म्हणत कधी मडगाव पोलिस, तर कधी एसआयटी अशा मडगाव व पणजीत खेपा घालणारे मडगावचे 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व कपड्यांचे व्‍यापारी मुसा सालेह महम्‍मद यांना शेवटी दै. ‘गोमन्तक’मुळे न्याय मिळाला.

जी तक्रार गेली अडीच वर्षे पोलिसांनी तंगवून ठेवली होती, ती दै. ‘गोमन्‍तक’ने पर्दाफाश केल्‍यानंतर मडगाव पोलिसांनी अवघ्‍या पाच तासांत नोंद करून या प्रकरणाचे मुख्‍य आरोपी सलीम इब्राहीम दोड्डामणी आणि राजदीप पुंडलिक कुंडईकर यांच्‍यासह एकूण पाच जणांवर अफरातफर व बनावटगिरीचा गुन्‍हा नोंद केला.

सोमवारी (ता. ८) दै. ‘गोमन्‍तक’च्‍या पहिल्‍या पानावर ‘तक्रार नोंदविण्‍यासाठी वृद्ध मारतोय हेलपाटे’ या मथळ्‍याखाली हे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

धड चालताही येत नसलेल्‍या मुसा आपल्‍याला न्‍याय मिळावा यासाठी पोलिस स्‍थानकाचे उंबरठे कसे झिजवतो आणि पोलिसांकडून त्‍यांना कशी दाद दिली जात नाही याची सविस्‍तर बातमी प्रसिद्ध झाली होती.

यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत दोड्डामणी आणि कुंडईकर यांच्‍याबरोबर मडगावचे नोटरी रमेश हळदणकर तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून हे प्‍लॉट ज्‍यांना विकले,

त्‍या महम्‍मद इस्‍माइल ललणवार आणि इरियास अब्दुल धलायत अशा पाच जणांवर भादंसंच्‍या 406 (फसवणूक करणे), 465 (बनावटगिरी), 471(खोट्या कागदपत्रांचा वापर करणे), 420 (बनावटगिरी) यासह 34 (संगनमताने गुन्‍हा करणे) कलमाखाली गुन्‍हा नोंद केला. सध्‍या या प्रकरणी मडगाव पोलिस स्‍थानकाचे उपनिरीक्षक समीर गावकर हे तपास करीत आहेत.

मुसा यांनी दिलेल्‍या तक्रारीप्रमाणे, दवर्ली येथील झरीवाडीमळ येथे त्‍यांना सासऱ्याच्‍या मालमत्तेतून दोन प्‍लॉट प्राप्‍त झाले होते. मात्र, त्‍यांची बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून राजदीप कुंडईकर (बाणावली) व सलीम दोडामणी (मोतिडोंगर - मडगाव) या दोघांनी भलत्‍यांनाच विकली.

या प्रकरणी मे 2020 मध्‍ये त्‍यांनी मडगाव पोलीस स्‍थानकावर तक्रार देण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, पोलिसांनीच त्‍यांना धमकावून ही तक्रार मागे घेण्‍यासाठी दडपण आणले.

अशी प्रकरणे हाताळण्‍यासाठी जेव्‍हा एसआयटीची स्‍थापना करण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍यांनी एसआयटीकडे ही तक्रार दिली. मात्र, या प्रकरणाची व्‍याप्‍ती कमी असल्‍यामुळे एसआयटीने ती पुन्‍हा मडगाव पोलिसांकडे पाठवली.

मुसा यांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे, जानेवारी 2019 मध्‍ये त्‍यांनी हे दोन प्‍लॉट विकण्‍याचे ठरविले होते. त्‍यासाठी त्‍यांनी दोडामणी यांच्‍याकडे संपर्क साधला.

दोडामणी यांनी जमिनीची कागदपत्रे त्‍यांच्‍याकडून मागून घेऊन त्‍यांच्‍या छायांकित प्रती काढून घेऊन ती कागदपत्रे त्‍यांना परत देण्‍यात आली.

सप्‍टेंबर 2019 मध्‍ये त्‍यांना देण्‍यात आलेली कागदपत्रे या मूळ प्रती नसून त्‍या छायांकित प्रती असल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांनी मडगाव पोलिस स्‍थानकात तक्रार दिली.

दरम्‍यानच्‍या काळात त्‍यांना आपले हे प्‍लॉट दुसऱ्याच कुणाला परस्‍पर विकल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे त्‍यांनी मडगाव पोलिस स्‍थानकात या प्रकरणाची तक्रार २०२० मध्‍ये नोंदविण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

मृत नोटरीच्‍या बनावट कागदपत्रांचा वापर!

हा व्‍यवहार 2019 मध्‍ये झाला होता. यासाठी जी पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करण्‍यात आली होती, ती रमेश कामत हळदणकर या नोटरीद्वारे करण्‍यात आली होती. मात्र, प्रत्‍यक्षात नोटरी हळदणकर यांचा सप्‍टेंबर 2014 मध्‍येच मृत्‍यू झाला होता.

त्‍यामुळे त्‍यांचे नाव वापरून कुणीतरी ही बनावट कागदपत्रे तयार केल्‍याचा आरोप आहे. त्‍यानंतर जी सक्सेशन डीड तयार करण्‍यात आली, तीही बनावट असल्‍याचा मुसा यांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT