Nuvem Dainik Gomantak
गोवा

Nuvem News: नुवेवासियांच्या आंदोलनाला अखेर यश, 'त्या' विषयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘पीडब्ल्यूडी’ला निर्देश

नुवेतील टॉवरसंदर्भात योग्य निर्णय घ्या!

गोमन्तक डिजिटल टीम

Nuvem गेल्या कित्येक दिवसांपासून नुवे येथील राष्ट्रीय हमरस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर हटविण्यासंदर्भात नुवे येथील नागरिकांनी आंदोलन केले होते.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आंदोलक तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक पोलिस, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या.

अखेर जिल्हाधिकारी कचेरीतून सार्वजनिक बांधकाम खात्याला या मोबाईल टॉवरसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मडगावच्या उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाला लिहिलेल्या पत्रामुळे गोरवोटी-नुवे येथील आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रासोबत वाहतूक पोलिसांनी जो अहवाल सादर केला आहे त्याची प्रत जोडलेली आहे.

नुवे येथील मोबाईल टॉवरला विरोध करणारे नागरिक मंगळवारी एकत्र जमले. गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांनी जी एकजूट व संयम दाखविला त्याला अखेर यश प्राप्त झाले.

10 एप्रिलपासून सरकारने आयटी टेलिकॉम धोरणात बदल केला असून कंटेन्मेंट क्षेत्र किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असे टॉवर या धोरणानुसार उभारता येणार नाहीत.

- एवर्सन वालेस, आंदोलक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Assembly Live: धार्मिक आणि व्यवहारिक भाषा ही 'मराठी' - आमदार जीत

Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

Horoscope: 'या' 3 राशींवर आज धनवर्षा होणार! लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे लाभच लाभ

Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

SCROLL FOR NEXT