Goa | Solar Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Solar Ferry Boat : अखेर सौर ऊर्जेवरील फेरीबोट 4 मे पासून कार्यान्वित

चोडण-पणजी जलमार्गावर सुविधा : खासगी कंपनीकडे दोन महिने चालविण्यासाठी देणार

विलास ओहाळ

ऑक्टोबर 2022 मध्ये उद्‍घाटन झाल्यानंतर नदी परिवहन खात्याकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सौर ऊर्जेवरील फेरीबोटीचा मांडवीतील प्रवास रखडला होता. मात्र, आता तिचा प्रवास सुरू होणार असून, खासगी कंपनीद्वारे दोन महिने ही बोट पणजी ते चोडण मार्गावर 4 मे पासून सुरू होणार आहे.

नदी परिवहन खात्याने गतवर्षी 3.90 कोटी रुपये खर्च करून या फेरीबोटीची बांधणी करून घेतली होती. सुरुवातीला ही बोट दिवाडी येथील ॲक्वारेस शिपयार्ड कंपनीने बांधली. त्यावेळी या कंपनीने नदी परिवहन खात्याला आम्ही ही बोट चालविण्यास मदत करतो, असे सांगितले होते.

परंतु बोट येताच या कंपनीने यातून अंग काढून घेतले. त्यामुळे नदी परिवहन खात्याने खासगी कंपनीकडे ती बोट देण्याचे ठरवले आणि निविदा मागविल्या. निविदा भरणाऱ्यांमध्ये गौरी कन्सल्टंट, विजय मरीन आणि गोवा सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होता. गौरी कन्सल्टंटने सर्वांत कमी 1 लाख 40 हजार रुपये आकारण्याची बोली केली होती.

‘नदी परिवहन’च्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

60 प्रवासी क्षमता असलेल्या या फेरीबोटीद्वारे गौरी कन्सल्टंट कंपनीचे कर्मचारी दोन महिन्यांत नदी परिवहन खात्याचे कर्मचारी प्रशिक्षित करणार आहेत. येत्या 4 मे पासून ही सेवा कार्यान्वित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार फेऱ्या, मोफत सेवा

पणजी ते चोडण या मार्गावर दिवसभरात या फेरीबोटीच्या सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशा चार फेऱ्या होणार आहेत. या फेरीबोटीची सेवा सुरुवातीला मोफत असेल. ही फेरीबोट सकाळी 8 आणि 9 वाजता निघेल. तसेच सायंकाळी 5.30 आणि 6.30 वाजता दोन फेऱ्या होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT