गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात जेलर अन् जेल रक्षक भिडले; रक्षक गंभीर जखमी

काही दिवसांपूर्वी याच कारागृहात कैद्यांचा कान कापल्याची घटना घडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवाळ कारागृहातून (Colvale Central Jail) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री कारागृह अधिकारी (Jailer) आणि कारागृह रक्षक (Jail Guard) यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला पोहोचला की त्यांच्यात हातापायी असून, यामध्ये कारागृह रक्षक गंभीर जखमी झाला आहे. कारागृह रक्षकाला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या भांडणात एका नायजेरियनचा कान कापल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कारागृह अधिकारी आणि कारागृह रक्षक एकमेंकाविरोधात भिडल्याची घटना समोर आली आहे.

भाजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 450 लिटर दारूसाठा जप्त

भाजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 450 लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. गोव्यातून कर्नाटकात भाजी वाहतूक केली जात असताना, कणकुंबी येथील चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बंगळुरू येथील ट्रक चालक जयराम (पूर्ण नाव समजू शकले नाही) याला अटक केली आहे.

म्हापसा पोलिसांकडून गांजासह एकाला अटक

म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police) पेडे येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. पोलिसांनी शहादत्त कलगडी (वय 21, कोलवाळ) याला अटक केली असून, दीड लाख रूपयांचा गांजा जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT