Dengue in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात डेंग्यूचे 96 संशयित, तर 51 पॉझिटिव्ह रुग्ण

डॉ. कल्पना महात्मे : वाळपई, कांदोळी, मोरपिर्लात मोठा प्रसार : नियंत्रणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात मॉन्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात पडला, ही उष्म्याने हैराण झालेल्या लोकांसाठी समाधानकारक गोष्ट असली, तरी त्यामुळे अनेक ठिकाणी डासांची पैदास झाली आहे. त्याअगोदर बाधित रुग्णांच्या संपर्कात हे डास आल्याने डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सध्या 96 संशयित रुग्ण असून 51 पॉझिटिव्ह सापडले आहेत. (Fifty one dengue cases in Goa)

डेंग्यूचे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी एकात्म रोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती डेंग्यू आणि मलेरिया विभागप्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.

डॉ. महात्मे म्हणाल्या, नागरिकांनी आपल्या परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. शिवाय साठवून ठेवलेले पाणी पॅकबंद करणे गरजेचे आहे. याच जागी डासांची पैदास होते. डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही रोगांच्या बाबतीत डास हे एकमेव संक्रमक आहेत. राज्यात मलेरिया पूर्णतः नियंत्रणात असला तरी डेंग्युने डोके वर काढले आहे.

प्रामुख्याने वाळपई तालुक्यातील अनेक गावांमध्ये डेंग्यूचे 60 संशयित रुग्ण सापडले आहेत. यापैकी 38 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.

राज्यात चार ठिकाणी चाचण्या

डेंग्यू आणि मलेरिया या रोगांच्या राज्यात चार ठिकाणी चाचण्या केल्या जात असून गोमेकॉ, म्हापसा व मडगाव येथील जिल्हा रुग्णालय आणि वास्को - चिखली रुग्णालयात चाचण्यांची सोय आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे अहवाल तातडीने मिळत आहेत.

हे करा आणि रोग पळवून लावा

  • डेंग्यू आणि मलेरिया हे रोग प्रामुख्याने डासांमुळे संक्रमित होतात.

  • त्यामुळे भोवतालच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. साचल्यास त्याचा तातडीने निचरा करावा.

  • घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी कापडाच्या साहाय्याने किंवा झाकणाच्या साह्याने पॅकबंद करावे. त्यामुळे डास अशा पाण्यामध्ये अंडी घालणार नाहीत.

  • राज्य सरकारच्या वतीने फॉगिंग मशीनच्या साह्याने डासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • यामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. लोकांचे सहकार्य मिळाल्यास एकात्म पद्धतीने रोगावर नियंत्रण मिळवता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT