Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa: मोरजी समुद्रकिनारी डांबर गोळ्यांच्या साठ्याला भीषण आग

किनाऱ्यावर जमा झालेले डांबराचे तेलगोळे कंपनीने मोरजी-टेमवाडा येथे साठवलेले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटकातील बीच क्लिनींग कंपनीने समुद्र किनाऱ्यावर जमा केलेल्या डांबर गोळ्यांना भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. समुद्र किनारा स्वच्छ करताना समुद्रातून किनाऱ्यावर जमा झालेले डांबराचे तेलगोळे कंपनीने मोरजी-टेमवाडा येथे साठवलेले होते. त्या साठ्याला भीषण आग लागली असून आगीच्या धुराचे लोट आसपासच्या परिसरात पसरले होते.

Fire in Goa

सदर किनारा हा कासवांच्या घरट्यांसाठी संरक्षित किनारा म्हणून ओळखला जात असल्याने याठिकाणी असे साठे करू नये, तसेच सदर घटनेची सरकारने दाखल घ्यावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सध्या गोव्यात वाढत्या उन्हामुळे डोंगराळ भागात आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तोरसे - पेडणे येथील एका काजू बागेला आग लागल्याची घटना घडली होती.

दरम्यान मोरजी किनारी ही आग कशी लागली, नुकसान किती झाले या बाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT