Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat: मोठी बातमी! गोव्यातील फेरी बोट सेवेचं खासगीकरण? सावंत सरकारने दिले संकेत

दिवसेंदिवस फेरी बोटी बिघडण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांकडून अनियमित फेरी सेवेबद्दल तक्रारी वाढत आहेत

दैनिक गोमन्तक

Ferry Boat: दिवसेंदिवस फेरी बोटी बिघडण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांकडून अनियमित फेरी सेवेबद्दल तक्रारी वाढत आहेत. फेरी बोटींची देखरेख नीट होत नसल्याने त्यांच्यात बिघाड होत आहे. तसेच खात्यात कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्यानेही समस्या उद्‍भवत आहे.

परिणामी फेरी सेवेच्या खासगीकरणाचा विचार सध्या नदी परिवहन खात्याकडून सुरू आहे, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

नदी परिवहन खात्यात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या आहे, परंतु ही एकच समस्या नसून नोकरभरतीचा प्रस्ताव योग्य विश्लेषणाअभावी संबंधित सरकारी खात्यांकडून परत पाठववण्यात येत आहेत. त्यात ओहोटी आणि धुके यांसारखी हवामान स्थिती देखील फेरी बोटींच्या कामात अडथळे आणतात.

प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी हवामानाच्या परिस्थितीनुसार पर्यायी मार्गाचे नियोजन करण्याची गरज आहे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.

रोरो फेरी आणण्याचा प्रस्ताव !

एकूण 32 फेरीबोटी 18 जलमार्गांवर कार्यरत आहेत. फेरीबोट जलवाहतुकीचे पारंपारिक साधन म्हणून सुरू झाल्यापासून क्वचितच सुधारणा झाली आहे. तसेच लोकसंख्या वाढल्याने फेरी बोटींची संख्याही वाढलेली नाही.

त्याचे मार्ग, देखभालीबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पात रोरो फेरी आणण्याचा प्रस्ताव आहे.

रोरो फेरीमुळे वाहतुकीचा वेग वाढवण्यात मदत होईल, परंतु या फेरी महागड्या असून विद्यमान अर्थसंकल्पात त्यांचा समावेश करता येणार नाही. पुढील सहा महिन्यात प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नदी परिवहन खाते प्रयत्नशील आहे, असे आश्‍वासन फळदेसाई यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

SCROLL FOR NEXT