Goa Lok Sabha Election 2024: BJP Office Floods with Applications of Female Candidate for South Goa Loksabha Constituency Dainik Gomantak
गोवा

South Goa BJP Candidate: दक्षिणेचा पेच! भाजप कार्यालयात महिला बायोडेटांचा खच; निवडणूक प्रभारी गोव्यात

South Goa BJP Lok Sabha Election Constituency: भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराची निवड करण्याचे ठरविल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa BJP Lok Sabha Election Constituency

सत्ताधारी भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराची निवड करण्याचे ठरविल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

आज दिवसभरात अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांना दूरध्वनी करून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. सध्या भाजपच्या मुख्य कार्यालयात अशा इच्छुकांचे बायोडेटा गोळा होऊ लागले आहेत.

भाजपने या मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि माजी आमदार दामू नाईक यांची नावे दिल्लीला पाठवली होती.

त्या नावांवर पक्षश्रेष्ठी समाधानी न झाल्याने त्यांनी कर्तबगार आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या महिलेच्या नावाचा विचार या मतदारसंघात करता येईल का, या पर्यायावर विचार करण्यास प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

भाजपने गाभा समितीची बैठक घेऊन सोमवारी या सूचनेची माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर भाजपला या मतदारसंघात महिला उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे वाटत होते.

प्रत्यक्षात मात्र भाजपच्या उमेदवारीवर दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक महिलांनी तयारी दाखवली आहे. त्यापैकी काहीजणी अद्याप भाजपच्या सदस्य देखील नाहीत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांचा मोबाईल आज दिवसभर अशा कॉल्समुळे वाजत होता. ते अशा इच्छुकांना आधी भाजपचे सदस्यत्व स्वीकारा, असा सल्ला देत होते.

केवळ राजकारणातीलच नव्हे, तर इतर अनेक क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाची गुढी उभी केलेल्या अनेक महिलांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रभारी सूद गोव्यात दाखल

भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद आज राज्यात दाखल झाले. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवारांची यादी तयार झाली की, त्यांच्या उपस्थितीत राज्य निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चिली जाणारी तीन-चार नावे दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीसमोर विचारार्थ पाठवली जाणार आहेत.

'दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवारीवर लढण्यासाठी अनेक महिलांनी तयारी दर्शविली आहे. आश्चर्य म्हणजे, राजकारणात नसलेल्या अनेक महिला यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांना सध्या भाजपचे सदस्यत्व स्वीकारा आणि आपली माहिती सादर करा, एवढाच सल्ला मी देत आहे,' असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT