Vasco Dengue Fever Dainik Gomantak
गोवा

Vasco Dengue Fever: ‘ब्ल्यू बॅरल’ मुळे वास्कोत वाढतेय डेंग्यूची भीती

पाणी साठविण्यासाठी वापर : आरोग्य खात्याकडून जनजागृती व तपासणीची आवश्‍यकता

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Dengue Fever: वास्कोत पुन्हा एकदा डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे; कारण ब्ल्यू बॅरल पाणी साठविण्याची पद्धत सुरू असल्याचे आढळले आहे.

2021 मध्ये मुरगाव तालुक्यात खासकरून वास्को आणि कुठ्ठाळी येथे ब्ल्यू बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवण्याच्या प्रकारांमुळे परिसरात डेंग्यूचा फैलाव झाला होता.

गेल्या आरोग्य खात्याने जागृती आणि तपासणी करून ब्ल्यू बॅरल पद्धत बंद केल्याने डेंग्यू बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता; परंतु आता ही नवीन माहिती समोर आल्यानंतर चिंता वाढली आहे.

2021 मध्ये वास्कोतील सडा भागात ब्ल्यू बॅरलचा वापर सुरू असल्याने मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.

तेव्हा आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी माहिती शिक्षण संवाद (आयईसी) माध्यमातून दारोदारी तपासणी करून यामागील स्रोताचा शोध लावून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आतादेखील याच उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

बऱ्याचदा परप्रांतीय मजुरांना भाडेपाट्टीवर दिलेल्या घरांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची पद्धत आहे. कधी कधी ते घर बंद करून जातात, त्यासाठी घराची एक अतिरिक्त चावी घरमालकाकडे असणे महत्त्वाचे आहे.

डेंग्यूसाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार कार्यक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना माहात्मे यांनी ‘दै.गोमन्तक’ला दिली.

आरोग्य खात्याच्या माहितीनुसारफेब्रुवारीमध्ये सात डेंग्यू प्रकरणांची पुष्टी झाली आहे. वास्कोत 2, म्हापसा, पेडणे, शिवोली, कोलवाळ, साळगाव येथे प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळलेत. 2023 मध्ये दोन महिन्यांत 11 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी याच काळात 31 रुग्ण आढळले होते.

डेंग्यूच्या स्रोतांची निर्मिती रोखण्यासाठी औद्योगिक वसाहतीत कामगारांची, विभागांची तसेच काही जागे बंद आते की नाहीत याची पडताळणी केली पाहिजे. त्याशिवाय धक्के, ट्रॉलर्स, हॉटेल्स, छोटी हॉटेल्स यांची तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. डेंग्यू नियंत्राणात ठेवण्यासाठी हा उपाय करण्याची आवश्‍यकता आहे.

- डॉ. कल्पना माहात्मे, (मुख्याधिकारी, संसर्गजन्य आजार)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

SCROLL FOR NEXT