Dengue fever Dainik Gomantak
गोवा

Dengue fever: वास्कोत डेंग्यू संसर्गाची भीती

2021 मध्ये मुरगाव तालुक्यातील काही ठिकाणी डेंग्यूने थैमान घातले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue fever वास्कोत पुन्हा एकदा डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे, कारण ब्लू बॅरल पाणी साठवण्याची पद्धत सुरू असल्याचे आढळले आहे. 2021 मध्ये मुरगाव तालुक्यातील वास्को आणि कुठ्ठाळी येथे ब्लू बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवण्याच्या प्रकाराच्यामुळे परिसरात डेंग्यूने थैमान घातले होते.

आरोग्य खात्याने जागृकता आणि तपासणी करून पद्धत बंद केल्याने डेंग्यू बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता, परंतु आता ही नवीन माहिती समोर आल्यानंतर चिंता वाढली आहे. 2021 मध्ये वास्कोतील सडा वाटारात ब्लू बॅरलचा प्रकार सुरू असल्याने मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.

तेव्हा आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती शिक्षण संवाद (आयईसी) माध्यमातून दारोदारी तपासणी करून स्रोतचा शोध लावून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आता देखील याच उपाय योजना करायला लागणार आहेत. बऱ्याचदा परप्रांतीय मजुराना भाडेपाट्टीवर दिलेल्या घरांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची पद्धत आहे.

कधी कधी ते घर बंद करून जातात, त्यासाठी घराची एक अतिरिक्त चावी घरमालकाकडे असणे महत्त्वाचे आहे. डेंग्यूसाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार कार्यक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना माहात्मे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT