Poor Quality Food Seized By Goa FDA Team Dainik Gomantak
गोवा

Goa FDA: फास्ट फूड खाताय? सावधान! फोंड्यात भंगार अड्ड्यावर सापडले बनावट आले-लसूण पेस्ट, फ्राईड कांदा व मसाल्याची पाकिटे

Goa FDA Raid: या बेकायदेशीर भंगार अड्डड्यावर लाकडी फळ्या व प्लायवूडची विक्रीही करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: वारखंडे-फोंडा येथील एका बेकायदा भंगार अड्ड्यावर बनावट आले-लसूण पेस्टचे डबे, फ्राईड कांदा आणि मसाल्याची पाकिटे विकण्याचा प्रकार फोंडा पालिकेने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला. या बेकायदेशीर कृत्याचा पंचनामा अन्न व औषध संचालनालयाने केला आहे.

फोंडा पालिकेने आज (मंगळवारी) पालिका क्षेत्रातील भंगार अड्यांवरील बेकायदेशीर केलेल्या कारवाईवेळी हा प्रकार समोर आला आहे. वारखंडे येथील हा बेकायदा भंगार अड्डा रशिद खान नामक इसम चालवत आहे तर सल्लाऊद्दीन अन्सारी नामक व्यक्ती तेथेच बनावट आले-लसूण पेस्ट व इतर साहित्य ठेवून त्याचा पुरवठा फास्ट फूडवाल्यांना करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या बेकायदेशीर भंगार अड्डड्यावर लाकडी फळ्या व प्लायवूडची विक्रीही करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फोंडा पालिका क्षेत्रातील चार बेकायदा भंगार अड्डयांवर कारवाई करण्यासाठी फोंडा पालिकेने नोटीस बजावली होती. त्यातील एका भंगार अड्डेवाल्याने न्यायालयात

धाव घेतली आहे. अन्य तीन भंगार अड्डयांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. यावेळी फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक, पालिका मुख्याधिकारी योगीराज गोसावी, पालिका अभियंता विशांत नाईक यांनी पालिका कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई केली. यावेळी फोंडा पोलिसही तैनात होते.

Poor Quality Food Seized By Goa FDA Team

'रॉयल एंटरप्रायझेस'च्या नावाखाली व्यवहार

'रॉयल एंटरप्रायझेस' या नावाखाली हा व्यवहार करण्यात येत होता. त्यासाठी सल्लाऊद्दीन अन्सारी याने कोणतेही सरकारी परवाने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भंगार अड्डयावर हे सामान ठेवण्यात आले होते, तेथेच चूल आहे. हे साहित्य तेथेच पॅक करत होते काय? असाही सवाल करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: राधाष्टमी आणि लक्ष्मी व्रताचा शुभ योग; 'या' 5 राशींसाठी रविवार ठरणार 'लकी'

गोव्याच्या जॅनामिका परेराची ‘उंच भरारी’; वयाच्या 21व्या वर्षी बनली पायलट

Konkan History: झाग्रोस पर्वतांच्या आसपासचे इराणी भारतीय उपखंडात आले! त्यांनी गहू, बार्ली, गुरेढोरे, मेंढ्या आणल्या; दख्खनमध्ये पोहोचले

Opinion: दिल्लीकर-राजकारणी-दलालांनी गोव्यातील गावांचे शहरीकरण करून ‘सत्यानाश’ केलाच आहे; गोमंतकीय प्रबोधन कला

प्रिया मराठे यांचे निधन! 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीने वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT