चिकन मार्केटची पाहणी करताना दयानंद ठक्कर, नेल्सन व इतर. Dainik Gomantak
गोवा

गोव्यात चिकन मार्केटवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई

लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांकडे लक्ष देण्यास मुरगाव (Mormugao) पालिकेच्या अधिकारी वर्गाला वेळच नसल्याबद्दल निज गोंयकारच्या पदाधिकारयांनी संताप व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

दाबोळी - निज गोंयकार (Niz Goenkar) या एनजीओच्या तक्रारीची दखल घेऊन वजन व माप विभाग (Weights and Measures), अन्न व औषध प्रशासन (Food & Drugs Administration), वास्को (Vasco) शहर आरोग्य केंद्र (Health Centre) यांनी केलेल्या संयुक्त पाहणीमध्ये येथील चिकन मार्केटातील गलिच्छपणा व विनापरवाना व्ययसाय करणे उघडकीस आले. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांकडे लक्ष देण्यास मुरगाव पालिकेच्या अधिकारी वर्गाला वेळच नसल्याबद्दल निज गोंयकारच्या पदाधिकारयांनी संताप व्यक्त केला. ज्या चिकन विक्रेत्यांकडे योग्य परवाने नव्हते त्यांना व्यवसाय बंद करण्याची निर्देश देण्यात आले. योग्य परवानानंतरच तेथे चिकन विक्री करण्याची सूचना त्यांना करण्यात आली. संयुक्त पाहणीचा अहवाल मुरगाव पालिकेला पाठविण्यात येणार आहे. (FDA raids meat shops in Goa)

येथील कुन्हा चौक परिसरात चिकन व मटण मार्केट आहे. तथापी येथे नेहमी गलिच्छपणा नजरेस पडतो. त्यामुळे निज गोंयकार ने मुरगाव पालिकेकडे तक्रार केली होती. परंतू पालिकेने त्या तक्रारीची दखल घेतली नाही. यामागील कारण उघड होऊ शकले नाही. मुरगाव पालिका तक्रारीची दखल घेत नसल्याने निज गोंयकार ने वजन व माप विभाग, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य केंद्र वगैरांना तक्रारी केल्या.त्यांनी मात्र तक्रारीची दखल घेताना गुरुवारी सकाळी संयुक्तपणे चिकन व मटण मार्केटाची पाहणी केली. याप्रसंगी निज गोयंकारचे अध्यक्ष सुरेश नाईक, कालिदास वायंगणकर, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नेल्सन, आरोग्य केंद्राचे दयानंद ठक्कर व इतर अधिकारी उपस्थित होते.

पाहणीच्या वेळी गलिच्छपणाबरोबर परवाने नसतानाही व्यवसाय करण्यात येत असल्याचे दिसून आले. कोंबड्या, बकरया कापणारया व्यक्तीच्या अंगावरील अप्रोन किती दिवस धुतला गेला नसल्याचे तसेच ज्या छोट्या पिंपामध्ये कोंबड्या कापून काही वेळ ठेवतात ते पिंपही अस्वच्छ असल्याचे दिसून आले. काहीजणांना व्यवसाय परवाना नसल्याचे तर काहीजणांनी परवानांचे नूतनीकरण केले नसल्याचे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे ना हरकत दाखला नसल्याचे उघ़डकीस आले.

याप्रकरणी निज गोंयकारचे अध्यक्ष सुरेश नाईक यांनी सदर प्रकराबद्दल संताप व्यक्त केला. आम्ही मुरगाव पालिकेला तक्रार केली होती. परंतू मुख्याधिकारयाने दाद दिली नाही असा आरोप त्यांनी केला. काही विक्रेत्यांकडे असलेले इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही प्रमाणित नाही. तेथे कूपनलिकेचे पाणी वापरण्यात येते. ते किती स्वच्छ असते हे माहित नाही.कोंबड्या, बोकड कापणारे कामगारांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसते. या सर्व गोष्टींचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरे तर चिकन, मटण मार्केटातील स्वच्छतेक़डे मुरगाव पालिकेने लक्ष देण्याची गरज होती. मुरगाव पालिकेची मार्केट समिती आहे. त्या समितीने लक्ष घालून तेथे स्वच्छतेचे पालन होते की नाही यासंबंधी नियमितपणे पाहणी करण्याची गरज आहे. परंतू तसे होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT