Goa Monsoon Updates: कुशावतीला पूर, पारोडा पूल पाण्याखाली

गोव्यामध्ये (Goa) केपे (Quepem) येथील पारोडा येथील पूल व मंडगावला जाणार मुख्य रास्ता गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे
A bridge submerged by overflowing river in Paroda Village of Goa
A bridge submerged by overflowing river in Paroda Village of GoaSushant Kunkolienkar

केपे: गोव्यामध्ये (Goa) केपे (Quepem) येथील कुशावती नदीला (Kushwati river) पूर आल्याने पारोडा येथील पूल व मंडगावला जाणार मुख्य रास्ता गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. काल रात्री दिनांक 22 रोजी 8.30 वा. सदर पूल पाण्याखाली गेला. (A bridge submerged by overflowing river in Paroda Village of Goa)

A bridge submerged by overflowing river in Paroda Village of Goa
दरड कोसळल्याने गोवा-बेळगाव महामार्ग बंद

काल दिवसभर व रात्री पडलेल्या पावसामुळे कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा येथील पूल व रस्ता पाण्याखाली गेला. काल दिवसभर कुशावती नदी दुथडी भरून वाहत होती. रात्री8.30 वा. पाण्याचा झोत वाढल्याने केपे ते मंडगावला जाणारा रस्ता व पारोडा गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात अली होती.

A bridge submerged by overflowing river in Paroda Village of Goa
Goa Floods: घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

रात्रीपासून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. आज पावसाने काही प्रमाणात विसावा घेतल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी पावसाचे ढग दाटुन राहिले आहेत. आज दुपारपर्यंत केपे ते मंडगावला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात अली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com