FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची छापेमारी; उत्तर गोव्यातील निकृष्ट काजू विकणाऱ्या तीन दुकानांविरोधात कारवाई

Goa FDA Raid: प्रशासनाने एक मोठी कारवाई केली. मंगळवारी (18 फेब्रुवारी) उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या काजूच्या तीन दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

Goa FDA Raid: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याचदम्यान प्रशासनाने एक मोठी कारवाई केली. मंगळवारी (18 फेब्रुवारी) उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या काजूच्या तीन दुकानांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

'या' तीन दुकानांविरोधात कारवाई

बालाजी काजू, पी. पटेल काजू आणि गोवा काजू हाऊस या तीन दुकानांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली. एमएस गोवा काजू हाऊसमध्ये निकृष्ट काजूची विक्री सुरु होती. कमी दर्जाच्या काजूच्या पॅकेटवर चांगले काजू असलेले स्टिकर लावून विक्री सुरु असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. या 3 विक्रेत्यांविरोधात कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, वजनाच्या स्केलमध्ये छेडछाड केल्याचेही आढळून आले. गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, साफिया खान आणि लेनिन देसा यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.

म्हापसा बसस्थानकावर कारवाई!

काही दिवसांपूर्वीच, म्हापसा (Mapusa) बसस्थानकावरुन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. प्रशासनाने म्हापसा बस स्थानकावरुन तब्बल दीड लाखांचे 500 किलो पनीर जप्त केले होते. मुंबईतून गोव्यात येणारे फ्रोजन फूड, मावा, मसाले यासारखे खाद्यपदार्थ या छापेमारीत जप्त केले होते. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील FDA अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनांची अचानक तपासणी करुन दीड लाखांचे पनीर जप्त केले होते. महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक येथून येणाऱ्या खाजगी वाहनावर ही कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT