Goa food safety news Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: उत्तर गोव्यात FDA एक्शन मोडवर!! 18 दुकानांची तपासणी; 8 सील, एकाला दंड

FDA raid Goa: करासवाडा आणि थिवी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १८ खाद्यपदार्थांच्या दुकानांची कसून तपासणी केली

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यातील अन्न व औषध प्रशासनाने उत्तर गोव्यात जोरदार धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी (११ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास करासवाडा आणि थिवी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १८ खाद्यपदार्थांच्या दुकानांची कसून तपासणी केली. यामध्ये बेकरी, ज्यूस सेंटर आणि फास्ट फूडच्या गाड्यांचा समावेश होता.

अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आठ दुकानांवर कठोर कारवाई केली. या दुकानांना तात्काळ त्यांचे कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच एका अन्न व्यवसाय चालकाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय. एवढंच नाही तर अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका मोठ्या बेस किचनमध्येही अस्वच्छता आढळल्याने तेही बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर गोव्याचे अन्न व औषध प्रशासन प्राधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील आणि शैलेश शेणवी यांच्यासह अमित मांद्रेकर, सुजाता शेटगावकर आणि लेनिन दे सा या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा या तपासणीत सहभाग होता.

या छाप्याबद्दल माहिती देताना सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध असल्याचं रिचर्ड नोरोन्हा म्हणालेत. येत्या काही आठवड्यांत राज्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारच्या तपासणी मोहिमा सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसाय चालकावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी दरम्यान स्पष्ट केलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT