FDA action North Goa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: उत्तर गोव्यातील अन्न उत्पादन युनिट्सवर FDAचा मोठा छापा; कोलवळमधील 'दम-बिर्याणी' बंद

Colvale Dum Biryani shop closed: या मोहिमेदरम्यान, सुकुर आणि करासवडा येथील सात युनिट्सची पुन्हा तपासणी करण्यात आली

Akshata Chhatre

पणजी: अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान, सुकुर आणि करासवडा येथील सात युनिट्सची पुन्हा तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने अनेक युनिट्स सील करण्यात आले आहेत.

एफडीएच्या उत्तर गोव्याचे नियुक्त अधिकारी रिचर्ड नॉरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील आणि अन्न सुरक्षा अधिकारी लेनिन दे सा, अमित मांद्रेक व स्नेहा गावडे यांच्या टीमने ही कारवाई केली. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यापूर्वी निर्देश दिल्यानंतर ज्या दोन युनिट्सनी सुधारणा केल्या होत्या, त्यांना पुन्हा कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीये. मात्र, इतर युनिट्समधील अस्वच्छता कायम असल्याने ती अजूनही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत.

याशिवाय, कोलवाळ येथे दम बिर्याणी बनवणारे दोन अत्यंत अस्वच्छ युनिट्स एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या युनिट्समध्ये साफसफाई आणि आरोग्याच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले.

अन्न व औषध प्रशासनाकडून ही कठोर कारवाई नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

अन्नपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे. येत्या काही दिवसांत ही तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे संकेतही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मडगावात केली होती कारवाई?

दक्षिण गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सासष्टी तालुक्यात काही दिवसांपूर्वी अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी मोहीम चालवली होती. या तपास मोहिमेदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन उत्पादन युनिट्स आणि एका रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेकरी युनिट, चिप्स बनवण्याचे उनिट्स यांच्यासह मडगावमधील एका मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT