FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: अयोग्य पद्धतीने साठवलेले 1,200 किलो चिकन एफडीएकडून नष्ट, मडगावात कारवाई

Margao: दक्षिण गोव्यातील एफडीए अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असता, हुबळीतून आलेल्या नॉन-इन्स्युलेटेड पिकअप वाहनातून हा चिकन साठा आणल्याचे आढळले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मडगावमधील केटीसी बसस्थानकासमोरील सौझा एन्क्लेव्हमधील सुपर रेडिएटर वर्क्स या दुकानात सुमारे ६०० चिकनच्या पाकिटांचा साठा अयोग्य स्वरूपात ठेवण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि मडगाव पालिकेच्या मदतीने संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.

प्रत्येक पाकिटात २ किलो चिकन असून प्रत्येक पाकिटाची किंमत ५०० रुपये होती. त्यानुसार एकूण साठ्याची अंदाजित बाजार किंमत ३ लाख रुपये असल्याची माहिती ‘एफडीए’ने दिली आहे.

दक्षिण गोव्यातील एफडीए अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असता, हुबळीतून आलेल्या नॉन-इन्स्युलेटेड पिकअप वाहनातून हा चिकन साठा आणल्याचे आढळले. चिकनची सर्व पाकिटे अयोग्य तापमानात आणि लेबलविना ठेवली होती.

संबंधित व्यावसायिकाकडे कोणतेही खरेदीचे बिल अथवा ‘एफएसएसएआय’ परवाना नव्हता. याशिवाय, चिकन साठवण्यात आलेली ‘सुपर रेडिएटर वर्क्स’ ही जागा एक दुकान आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्नसाठा करण्याचा किंवा विक्रीचा परवाना नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मडगाव पालिकेचे साहाय्य

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा संपूर्ण साठा तातडीने मडगाव नगरपालिकेच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अतुल देसाई, माधव कवळेकर आणि प्रतीक्षा चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT