FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: ‘एफडीए’ची धडक कारवाई सुरुच! 3 बिर्याणी किचनवर बंदी; 50 किलो निकृष्ट काजू जप्त

FDA Raid Calangute Nagoa: संबंधित तीन किचन झोपडपट्टीत विना परवाना सुरू करण्यात आले होते. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत अन्न परवाने नव्हते. या ठिकाणी स्वच्छतेच्या कोणत्याही अटी पाळल्या जात नव्हत्या.

Sameer Panditrao

पणजी: नागोवा व कळंगुट परिसरात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मोठी धडक कारवाई केली. येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन बिर्याणी किचनना तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई एफडीए अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर आणि नोसिन मुल्ला यांनी संयुक्तपणे केली असल्याची माहिती एफडीए संचालिका श्वेता देसाई यांनी दिली.

संबंधित तीन किचन झोपडपट्टीत विना परवाना सुरू करण्यात आले होते. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत अन्न परवाने नव्हते. या ठिकाणी स्वच्छतेच्या कोणत्याही अटी पाळल्या जात नव्हत्या. या किचनमधून किनारपट्टी भागातील अनेक किरकोळ विक्रेत्यांना बिर्याणी पुरवली जात होती. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून या किचनना बंद करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय, कळंगुटमधील एका किरकोळ काजू विक्री केंद्रावरही कारवाई करण्यात आली. येथे सुमारे ५० किलो निकृष्ट प्रतीचा काजू विक्रीसाठी ठेवलेला होता. एफडीए अधिकाऱ्यांनी तो काजू जप्त करून संबंधित दुकानास विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

बाटलीबंद पाणी युनिटवर धाड

अन्न व औषध प्रशासनाने आणखी एक कारवाई करत, एफएसएसएआय परवाना नसतानाही बाटलीबंद पाणी वितरित करणाऱ्या एका घाऊक युनिटवर धाड टाकली. हे पाणी महाराष्ट्रातील एका उत्पादकाकडून आणले जात होते. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या युनिटलाही त्वरित वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT