FDA Goa warns Abbott India on antacid Digene licence suspension 
गोवा

Abbott Licence Suspension: सात दिवसांत परिस्थिती सुधारा, FDA गोवाकडून प्रसिद्ध युएस औषध कंपनीला परवाना निलंबित करण्याचा इशारा

Abbott Licence Suspension: अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजच्या भारतात दोन फॅक्टरीज आहेत, त्यापैकी एक गोव्यात आहे.

Pramod Yadav

FDA Goa warns Abbott India on antacid Digene Licence Suspension: गोवा सरकारकडून अमेरिकन औषध कंपनीला अँटासिडचा परवाना निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजच्या अँटासिड औषधाच्या उत्पादनात भेसळ आणि स्वच्छतेचा मुद्दा निरीक्षकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारने कंपनीविरोधात सक्त धोरण अवलंबले आहे.

मूळ अमेरिकेतील असलेली औषध निर्माता कंपनी अ‍ॅबॉट लॅबोरेटरीज औषध नियामकांमुळे गोव्यात वादात सापडली आहे.

कंपनीच्या डायजिन जेल सिरपमध्ये चव आणि वासबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कंपनीने सिरपच्या अनेक बॅच परत मागवल्या होत्या. पण, या औषधाचा रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजच्या भारतात दोन फॅक्टरीज आहेत, त्यापैकी एक गोव्यात आहे. अ‍ॅबॉटचे डायजिन जेल सिरप कंपनीचे एक मुख्य उत्पादन असून, त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

गोव्यातील औषध फॅक्टरीचे २४ ऑगस्ट आणि ०२ सप्टेंबर रोजी निरीक्षकांच्या द्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप यांच्या स्वच्छतेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यानंतर गोवा एफडीएकडून कंपनीला नोटीस बजावण्यात आली. कपंनीला सात दिवसांत परिस्थिती सुधारण्याची सूचना करण्यात आली असून, अन्यथा परवाना रद्द केला जाईल असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT