FDA Dainik Gomantak
गोवा

Goa FDA: 'एफडीए' ॲक्शन मोडवर; मडगाव, किरभाट, वेर्णा येथे तपासणी मोहीम

FDA Raid: पथकांकडून किरभाट-नुवे, वेर्णा, नागोवात उत्पादक युनिटची झाडाझडती, वेर्णा येथे अस्‍वच्‍छ परिस्‍थितीमुळे काम बंद करण्‍याचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एफडीएने कदंब बसस्‍थानक, मडगाव येथे शनिवारी सकाळी तपासणी मोहीम राबविली. मोहिमेत सहभागी झालेल्‍या अधिकाऱ्यांमध्ये संज्‍योत कुडाळकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, अमित मांद्रेकर, स्‍नेहा नाईक, अभिषेक नाईक यांचा समावेश होता.

शेजारील राज्‍यांतून येणाऱ्या बसमधून खाद्यपदार्थांची वाहतूक मडगाव कदंब बसस्‍थानकावर होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने ही तपासणी केल्‍यावर मडगाव बसस्‍थानकावर कोणतेही खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत. त्‍यासाठी अनेक बसेसची तपासणी करण्‍यात आली. त्‍यानंतर मिठाई आणि फरसाण उत्‍पादन युनिटची स्‍थिती पाहण्यासाठी किरभाट नुवे येथे सामान्‍य उत्‍पादन युनिटची तपासणी करण्‍यात आली आणि स्‍पॉट तपासणी अहवाल देण्‍यात आला.

नागोआ, वेर्णा येथील एका रिटेल आवारात एफबीओ विविध पुरवठादारांकडून कोणत्याही अधिकृत बिलाशिवाय खरेदी केलेले खाद्यपदार्थ पुन्‍हा पॅकिंग करताना आढळले. वेर्णा येथील ज्‍या उत्‍पादकाचे लेबल वापरताना ते आढळले, त्‍या उत्‍पादकाला अस्‍वच्‍छ परिस्‍थितीमुळे काम बंद करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT