FDA Raid X
गोवा

FDA Raid: ‘एफडीए’ ॲक्शन मोडवर! 2460 किलो चिकन, 500 किलो पनीर, 10 किलो खवा जप्त

FDA Raid Goa: बाहेरील राज्यांमधून गोव्याच्या सीमांवरून मोठ्या प्रमाणात ‘हाय रिस्क फूड’ निकृष्ट दर्जाचे येत असल्याने आता ‘एफडीए’ने सीमांवर अशा प्रकारच्या देखरेख मोहिमा व छापे हाती घेतले आहेत.

Sameer Panditrao

साखळी: अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने पत्रादेवी, केरी आणि मोले या राज्याच्या तीन सीमांवर देखरेख मोहीम राबवली. यात केरी चेकनाक्यावर १७६० किलो अवैध चिकन, ५०० किलो अवैध पनीर तर मोले चेकनाक्यावर ७०० किलो चिकन आणि पत्रादेवी येथे १० किलो खवा जप्त केला.

बाहेरील राज्यांमधून गोव्याच्या सीमांवरून मोठ्या प्रमाणात ‘हाय रिस्क फूड’ निकृष्ट दर्जाचे येत असल्याने आता ‘एफडीए’ने सीमांवर अशा प्रकारच्या देखरेख मोहिमा व छापे हाती घेतले आहेत, असे सांगण्यात आले. ही मोहीम २१ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. केरी, मोले व पत्रादेवी या तिन्ही चेकनाक्यांवर प्रत्येकी पाचजण अशी तीन पथके रात्रभर तैनात होती. एकूण १५ अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत गुंतले होते.

‘एफडीए’च्या संचालक श्वेता देसाई यांच्या नेतृत्वाखाली या देखरेख मोहिमेत अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोव्यात पत्रादेवी येथे योगीता सिरसाट, राम धुरी, भक्ती वाळके, प्रीतम परब, प्रदीप पार्सेकर आणि अर्जुन नाईक.

केरी येथे राजाराम पाटील, लेनीन डिसा, अमित मांद्रेकर, दार्लन दिवकर, गौरीश गावकर, संदीप शेळके. तर मोले येथे शैलेश शेणवी यांच्या नेतृत्वाखाली अतुल देसाई, अभिषेक नाईक, आत्माराम नाईक, स्वप्नील फातर्पेकर, सुदित नाईक आणि डोमिंगो गोन्साल्विस यांनी काम केले.

ही मोहीम अन्नाने भरलेल्या आंतरराज्यीय वाहनांची तपासणी करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आली होती. पथकाने गोव्यात प्रवेश करणाऱ्या अन्न वाहनांची पडताळणी केली आणि विश्लेषणासाठी अनेक अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. पथकाला मागील भेटींच्या तुलनेत नियम पाळण्याच्या बाबतीत यावेळी बऱ्याच सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले.

मात्र, अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी आणि उच्च प्रमाणात नियम पालन व्हावे यासाठी ‘एफडीए’चे प्रयत्न असून पथकाने अन्न पुरवठादारांना कायदेशीर आवश्यकतांबाबतही जागरूक केले. भाज्या आणि फळांचे अनेक अन्न नमुने काढण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: इम्रान यांच्याबाबत संशयाचे धुके, मृत्यू झाल्याची चर्चा; अधिकृत स्पष्टीकरण नाही

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! उपकरणांच्या उत्पादनाला बळ, दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाला मंजुरी

ZP Election: आरोग्यसेवेसाठी 'आप'चे खास प्रयत्‍न, जि.पं. निवडणुकीत विजयी झाल्‍यास विकास जनतेच्‍या दारी - सुवर्णा हरमलकर

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

SCROLL FOR NEXT