I-League Football Dainik Gomantak
गोवा

I-League Football: एफसी गोवाने नोंदविला पहिला विजय

द्वितीय विभाग आय-लीग: हैदराबाद एफसीवर एका गोलने निसटती मात

गोमन्तक डिजिटल टीम

एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाने द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात सोमवारी पहिल्या विजयाची नोंद केली. बंगळूर येथे त्यांनी हैदराबाद एफसी (राखीव) संघावर 1-0 अशी निसटती मात केली.

डेल्टन कुलासो याने सामन्याच्या 77 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात गोल नोंदविला. मागील लढतीत एफसी गोवाने अंबरनाथ युनायटेडला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले होते.

चार सामने खेळल्यानंतर एक विजय, एक बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह आता एफसी गोवाचे चार गुण झाले आहेत. हैदराबादचा हा तिसरा पराभव ठरला, त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचा एक गुण कायम आहे.

पाच संघांच्या गटात एआरए एफसी व धेंपो स्पोर्टस क्लबचे प्रत्येकी आठ, तर अंबरनाथ युनायटेडचे पाच गुण आहेत. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना मुंबईतील कुपरेज मैदानावर अंबरनाथ युनायटेडविरुद्ध सात एप्रिल रोजी खेळला जाईल.

चर्चिल ब्रदर्स-धेंपो क्लबची बरोबरी

दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत 10 खेळाडूंसह खेळूनही चर्चिल ब्रदर्सने धेंपो स्पोर्टस क्लबला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. सामना माँत द गिरी मैदानावर झाला. चर्चिल ब्रदर्सच्या ॲरोन बार्रेटो याला 41 व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले.

धेंपो क्लबसाठी आठव्या मिनिटास तोपोन मिंज याने पहिला गोल केला. 56 व्या मिनिटास मेव्हझेन ऑलिव्हेरा याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधता आली.

85 व्या मिनिटास ॲस्मॉन व्हिएगस याच्या गोलमुळे धेंपो क्लबने पुन्हा आघाडी प्राप्त केली. मात्र 90व्या मिनिटास श्राईन क्लेमेंत याने केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला बरोबरीचा एक गुण मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT