गोवा

Durand Cup: एफसी गोवाचा पहिला विजय, एअर फोर्सवर निसटती मात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या आठव्या मिनिटास आघाडीपटू मुहम्मद नेमिल याने केलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा (FC Goa) संघाने शुक्रवारी यावेळच्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत (Durand Cup Football) पहिला विजय नोंदविला. त्यांनी इंडियन एअर फोर्स संघाचे (Indian Air Force) कडवे आव्हान परतावून लावताना सामना 1-0 असा निसटता जिंकला.

स्पर्धेच्या 'अ' गटातील सामना कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर (Kishor Bharati Stadium, Kolkatta) झाला. अगोदरच्या सामन्यात एफसी गोवास पूर्वार्धात आघाडी घेऊनही मोहम्मेडन स्पोर्टिंगकडून 1-3 फरकाने पराभव पत्करावा लागला होता. शुक्रवारी पूर्ण तीन गुण प्राप्त करत एफसी गोवाने गुणतक्त्यात खाते उघडले. त्यांचा पुढील सामना 26 ऑगस्ट रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. इंडियन एअर फोर्सचा हा पहिलाच सामना होता.

नेमिलची पुन्हा छाप

मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध एफसी गोवाचा एकमात्र गोल नेमिल याने नोंदविला होता. शुक्रवारीही त्याचा गोल मौल्यवान ठरला. ड्युरँड कप स्पर्धेत या युवा आघाडीपटूने आता 8 सामन्यांतून 6 गोल नोंदविले आहेत. एफसी गोवास आघाडी मिळवून देताना त्याने एअर फोर्स संघाचा बचाव बेसावध असल्याची संधी साधली.

संघात तीन बदल

एफसी गोवाने एअर फोर्सविरुद्धच्या लढतीसाठी संघात तीन बदल केले. मलिकजान कलेगर, आयुष छेत्री व मेव्हन डायस यांना संधी देताना प्रशिक्षक डेगी कार्दोझ यांनी रायन रॉजर मिनेझिस, शेनॉन व्हिएगस व जोव्हियल डायस यांना बेंचवर बसवले.

एअर फोर्सचे चोख प्रत्युत्तर

एफसी गोवाने सामन्याच्या सुरवातीस आघाडी घेतली, तरी एअर फोर्सने चोख प्रत्युत्तर दिले. विवेक कुमार याने चाळीस यार्डावरून मारलेल्या सणसणीत फटक्यावर 17 व्या मिनिटास चेंडूची दिशा थोडक्यात चुकली आणि त्यामुळे एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली. उत्तरार्धातील खेळ सुरू असताना पाऊस आला. मैदान निसरडे बनल्यामुळे चेंडूवर ताबा राखताना खेळाडूंना संघर्ष करावा लागला.

एअर फोर्सचा गोलरक्षक शिबिनराज याच्या दक्षतेमुळे एफसी गोवाचा डेल्टन कुलासो गोल नोंदवू शकला नाही. गोव्यातील संघाच्या ह्रतीक तिवारी याने पुन्हा एकदा भक्कम गोलरक्षण केल्यामुळे 75 व्या मिनिटास व नंतर भरपाई वेळेत एअर फोर्स संघ गोल नोंदवू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT