FC Goa beat Jamshedpur FC Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवाचा निसटता विजय; जमशेदपूरविरुद्ध बोर्हा हेर्रेराचा गोल ठरला निर्णायक!

FC Goa beat Jamshedpur FC: बोर्हा हेर्रेरा याने 90+5व्या मिनिटास प्रतिस्पर्धी गोलरक्षक विशाल यादव याचा बचाव भेदला आणि एफसी गोवास 3-2 अशी आघाडी मिळाली.

किशोर पेटकर

Indian Super League: सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू (सुपर सब) बोर्हा हेर्रेरा याने केलेल्या गोलच्या बळावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने निसटता विजय नोंदवला. त्यांनी जमशेदपूर एफसीला 3-2 फरकाने पराभूत केले. जमशेदपूर येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुल स्टेडियमवर मंगळवारी सामना झाला. 79व्या मिनिटास कार्लोस मार्टिनेझच्या जागी मैदानात उतरलेल्या बोर्हा हेर्रेरा याने 90+5व्या मिनिटास प्रतिस्पर्धी गोलरक्षक विशाल यादव याचा बचाव भेदला आणि एफसी गोवास 3-2 अशी आघाडी मिळाली.

त्यापूर्वी, मोरोक्कन नोआ सदोई याने 21व्या मिनिटास लाजवाब फटक्यावर एफसी गोवास 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती, तर स्पॅनिश कार्लोस मार्टिनेझने 28व्या मिनिटास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. सामन्याच्या 17व्या मिनिटास जपानी खेळाडू रेई ताचिकावा याने कॉर्नर फटक्यावर जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बदली खेळाडू सेईमिन्लेन डौंगेल याने प्रतिहल्ल्यावर यजमान संघाला 2-2 अशी बरोबरी गाठून दिली होती. एफसी गोवाचे काही फटके गोलपोस्ट किंवा क्रॉसबारला आपटले नसते, तर त्यांना एकतर्फी फरकाने सामना जिंकता आला असता.

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी

एफसी गोवाचा हा सलग तिसरा, तर स्पर्धेतील एकंदरीत 12वा विजय ठरला. विजयाच्या पूर्ण तीन गुण प्राप्त केल्याने एफसी गोवाचे आता 21 सामन्यांतून 42 गुण झाले आहेत. एक सामना कमी खेळलेल्या मोहन बागानचेही 42 गुण आहेत. त्यांची गोलसरासरी +16 अशी सरस असल्याने ते दुसऱ्या स्थानी असून एफसी गोवा +15 गोलसरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई सिटी 47 गुणांसह अव्वल स्थानी आहे. जमशेदपूरला 11वा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 22 लढतीनंतर त्यांचे 21 गुण व दहावा क्रमांक कायम राहिला. या लढतीसह जमशेदपूरची स्पर्धेतील मोहीमही संपली. एफसी गोवाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 14 एप्रिल रोजी फातोर्डा येथे चेन्नईयीन एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT