Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात आज होणार चुरशीची लढत

Manish Jadhav

Indian Super League: एफसी गोवा आता जास्त तुल्यबळ संघ बनला आहे, आमच्यापाशी चांगले खेळाडूही आहेत. त्या जोरावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील प्ले-ऑफमधील (उपांत्य फेरी) पहिल्या टप्प्यात मुंबई सिटी एफसीचा चोख प्रत्युत्तर देण्याचा विश्वास मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दरम्यान, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर बुधवारी (ता. 24) खेळताना घरच्या मैदानावरील वातारणाचा आणि चाहत्यांच्या प्रोत्साहनाची संधी साधण्यासाठी एफसी गोवा सज्ज झाला आहे. यावेळच्या आयएसएल स्पर्धेत मध्यंतरीच्या खराब कामगिरीनंतर एफसी गोवा सलग आठ सामने अपराजित (6 विजय, 2 बरोबरी) आहेत, त्यापैकी पाच विजय ओळीने नोंदवले आहेत. बुधवारी घरच्या मैदानावर एफसी गोवाने मुंबई सिटीविरुद्ध विजय नोंदवल्यास अंतिम फेरी गाठण्याचा त्यांचा दावा आणखीनच भक्कम होईल. फातोर्ड्यात विजय नोंदवल्यास उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी एफसी गोवास बरोबरी पुरेशी ठरेल.

दुसरीकडे, फातोर्डा येथे मागील प्ले-ऑफ बाद फेरी लढतीत चेन्नईयीन एफसीला 2-1 फरकाने हरवून एफसी गोवाने स्पर्धेच्या इतिहासात सातव्यांदा उपांत्य फेरी गाठली. त्या लढतीत नोआ सदोई व ब्रँडन फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. या दोघाही प्रमुख खेळाडूंनी चांगला फॉर्म प्रदर्शित केला. प्ले-ऑफ फेरीपूर्वी अखेरच्या साखळी लढतीत कोलकाता येथे मोहन बागानविरुद्ध 1-2 फरकाने हार पत्करल्यामुळे मुंबई सिटीस शिल्डला मुकावे लागले होते व गुणतक्त्यात दुसरा क्रमांक मिळाला.

सकारात्मक निकालाचे ध्येय

मुंबई सिटीने प्रशिक्षक बदलला, तरी त्यांचे खेळाडू आणि शैली बदललेली नाही. त्यांचाही आक्रमकतेवर भर असतो. मोसमातील मागील दोन्ही लढतीत बरोबरीत राहिल्या. उद्याची लढत पूर्णतः वेगळी असेल. आम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत झुंज देऊ. आमच्यापाशी चांगले खेळाडू असून आम्ही आता जास्त तुल्यबळ बनलो आहोत. पुढील लढतीसाठी प्रवास करण्यापूर्वी सकारात्मक निकाल मिळविण्याचे ध्येय बाळगले आहे, असे मार्केझ यांनी बुधवारच्या लढतीविषयी सांगितले. घरच्या मैदानावर एफसी गोवाने यंदा जास्त सामने जिंकले असले, तरी स्पर्धेत गमावलेल्या तीनपैकी दोन लढती फातोर्ड्यात आहेत, त्यामुळे निश्चिंत राहता येणार नाही, असेही मार्केझ यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT