Fatorda Swimming Pool to Opening: फातोर्डा येथील जलतरण तलाव तीन वर्षांहून अधिक काळ बंद आहे, पण जलतरण बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
गोवा क्रीडा प्राधिकरण (एसएजी) च्या म्हणण्यानुसार, कोविड-19 दरम्यान लोकांसाठी बंद करण्यात आलेला हा पूल येत्या पंधरवड्यात खुला केला जाईल.
एसएजीच्या मालकीचा फातोर्डा येथील पूल 1997 मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र काही कालावधी नंतर पुलाचे दुरुस्तीचे काम समोर आले. पूलची कार्यप्रणाली जुनी झाली होती तसेच पाईपलाईन गंजलेली होती, त्यामुळे हा पूल वापरासाठी बंद होता.
अधिकार्यांच्यादिलेल्या माहितीनुसार, एसएजीने सुरुवातीला या वर्षी फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्याला विलंब झाला. मात्र आता पुलाचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे आणि नवीन फिल्टरेशन प्लांट आधीच बसविण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून या सुविधेपासून वंचित असलेले जलतरणपटू आता याचा लाभ घेऊ शकतात. जलतरण तलावाच्या बाहेरील नूतनीकरणाबाबत विचारले असता, SAG अधिकाऱ्यांनी सांगितले की ते ही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
जेव्हा हे सर्व काम व्यवस्थित असेल, त्यामध्ये चेंजिंग रूम आणि बाथरूममधील टाइल्सचा बसवण्यात येतील, तेव्हाच पूल लोकांसाठी खुला kaकरण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.