Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: फातोर्ड्यातही अवतरला एक 'पिसाट'! संशयित गजाआड, स्केटिंग प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

Fatorda Sexual Assault Case: सोहम नाईक याने केलेला प्रकार सध्या चर्चेत असतानाच फातोर्डा येथील रजत इरकल (२३) या स्केटिंग प्रशिक्षकाचा असाच एक प्रकार उघडकीस आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधून त्यांचे ग्रुमिंग केल्यावर त्यांचा ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करण्याचा कुडचडे येथील सोहम नाईक याने केलेला प्रकार सध्या चर्चेत असतानाच फातोर्डा येथील रजत इरकल (२३) या स्केटिंग प्रशिक्षकाचा असाच एक प्रकार उघडकीस आला असून त्याने एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून फातोर्डा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कुडचडे येथील सोहम नाईक प्रकरण ताजे असतानाचा अशाच प्रकारची एक घटना फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही नवीन घटना घडली आहे, एका १३ वर्षीय मुलीचा स्केटिंग प्रशिक्षक असलेल्या या नराधमाने हे कांड केले असून आज त्याला मडगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसांचा रिमांड देण्यात आला.

मोबाईलवर फोटो पाठवल्यानंतरही संशयित तिला छळत होता. शेवटी हा प्रकार असह्य झाल्याने तिने घरच्या लोकांना ही घटना सांगितली. मागाहून

पीडितेच्या आईने सरळ पोलिस ठाणे गाठून, रीतसर तक्रार दाखल केली व पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणी संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१, ७९, गोवा बाल कायदा कलम ८ व पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सलील देसाई पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT