Arrested Dainik Gomantak
गोवा

गांजा बाळगल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या, 'एवढ्या' किमतीचा गांजा जप्त; पुढील तपास सुरु

Fatorda Police: गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

राज्यात फोफावलेल्या ड्रग्ज कल्चरवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. यातच आता, फातोर्डा पोलिसांनीही अशीच कारवाई केली आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विनायक मलाप्पा जाधव असे आहे. तो बोर्डा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी यावेळी संशयित विनायकडून तब्बल 31, 400 किमतीचा 314 गांजा जप्त केला. फातोर्डा पोलिस आता पुढील तपास करतायेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिशातील (Odisha) तरुणाला अटक करण्यात आली होती. सायमन माळी (वय 23, रा. ओडिशा) असे या अटक तरुणाचे नाव होते. सायमनजवळ तीन लाख 10 हजार रुपये किंमतीचा 3.10 किलो गांजा आढळून आला होता. अंजुना अर्पोरा येथे ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले होते.

तर दुसरीकडे, गांजा बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मूळच्या महाराष्ट्रमधील (Maharashtra) एका 35 वर्षीय तरुणाला रंगेहाथ पकडून अटक केली होती. अंकुश काळे असे संशयिताचे नाव होते. त्याच्याकडून पोलिसांनी 840 ग्रॅम वजनाचा 84 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरबोवाडा येथील बोडकेवड जंक्शनजवळ ही कारवाई पोलिसांनी केली होती. याठिकाणी संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत ही कारवाई केली होती.

थिवी रेल्वे स्टेशनजवळही दोन लोकांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. प्रभुदत्त त्रिपाठी (वय 28, ओडिशा) आणि श्याम सुंदर सिंग (वय 23,ओडिशा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे होती. त्यांच्याकडून तब्बल 5.10 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Forecast: सूर्य ओकतोय आग, नागरिक हैराण; राज्यातील तापमान 36 अंशांवर, उष्माघात टाळण्यासाठी थंड पेयांकडे वाढता कल

Goa Water Resources Department : राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्स जूनपासून होणार 'सील; जलस्रोत खात्याकडून सर्व्हे सुरू, मंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती

Shani Gochar 2026: शनिश्चरी अमावस्येनंतर शनी पालटणार नशीब! 'या' 5 राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, रखडलेली कामे मार्गी लागणार

Goa High Court: ‘खुली सुधारसंस्था’ सुरू करा! न्यायालयाचे सरकारला निर्देश; पुढील सुनावणी जूनमध्ये

Goa Waste Management : कुडचडेत युवकांचा एल्गार! घातक कचऱ्याची वाहतूक रोखली; दोन डंपर पोलिसांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT