madgaon dahi handi pushpa video Dainik Gomantak
गोवा

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Goa Dahi Handi Viral Video: या कार्यक्रमात चक्क 'पुष्पा'च्या वेशातील एका कलाकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

Akshata Chhatre

मडगाव: गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह देशभरात मोठ्या आनंदात साजरा होतो. यंदा गोव्यात मात्र या उत्सवामध्ये एक अनोखा ट्विस्ट पाहायला मिळाला. काही महिन्यांपूर्वी बॉक्स ऑफिस गाजवलेल्या 'पुष्पा' चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे, हे मडगावमधील एका दहीहंडीच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. या कार्यक्रमात चक्क 'पुष्पा'च्या वेशातील एका कलाकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

'झुकेगा नही'

शनिवारी (१६ ऑगस्ट) मडगावमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एक व्यक्ती 'पुष्पा'च्या वेशभूषेत दाखल झाला. त्याला पाहून जमलेल्या लोकांमध्ये 'हा खरा अल्लू अर्जुन तर नाही ना?' असा प्रश्न क्षणभर निर्माण झाला. या 'पुष्पा'ने हुबेहूब अल्लू अर्जुनची नक्कल करत, एका जीपमधून जबरदस्त एन्ट्री घेतली. एका हातात चमकणारी कुऱ्हाड घेऊन आणि 'पुष्पा'च्या खास अंदाजात नाच करत त्याने सर्वांना थक्क केलं.

सोशल मीडियावर धुमाकूळ

या कलाकाराचे व्हिडिओ सध्या गोवन फॉर एक्सप्लोरर आणि गोवा डॉट कॉम यांसारख्या सोशल मीडिया अकाउंट्सवर व्हायरल होत आहेत आणि त्याला नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी याला 'मिशोचा पुष्पा' म्हणत मिश्किल टीका केली आहे, तर काही नेटकऱ्यांनी 'पुष्पराज' साकारणाऱ्या या कलाकाराच्या कौशल्याचे कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर 'मी फातोर्ड्यात असूनही मला हे कसे कळले नाही?' अशा मजेदार प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

या घटनेमुळे गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्साहाला आधुनिक आणि मनोरंजक ट्विस्ट मिळाला आहे. 'पुष्पा' चित्रपटाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे, हे यातून स्पष्ट होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT