fatorda  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : फातोर्डात विकासकामांचे उद्‍घाटन; ५० लाखांचा खर्च

Fatorda News : पदपथ सुशोभीकरण, सोलर बत्तीची सोय

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्‍टी, फातोर्डातील प्रभाग-९ मधील मार्ले परिसरात पदपथ सुशोभीकरण, सोलर दिवाबत्तीची सोय तसेच विविध ठिकाणी गटार उभारणी आणि त्यावर फरशा अशाप्रकारे ५० लाख रुपयांचा निधी खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या विकासकामांचे शुक्रवारी (ता.१२) उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, स्थानिक नगरसेवक रवींद्र ऊर्फ राजू नाईक, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, पालिका अभियंता दीपक देसाई, ठेकेदार बालेश देसाई व अन्य उपस्थित होते.

पालिकेकडून ३२ लाख रुपयांचा निधी वापरून मार्लेत पदपथ सुशोभीकरण, त्यावर बाकडे, तसेच सोलर दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. याखेरीज एसटी निधीतून १८ लाख रुपयांची निविदा काढून प्रभागातील चार वेगवेगळ्या ठिकाणी गटार बांधले तसेच त्यावर फरशा घालण्यात आल्या आहेत.

जीएसटीसह एकूण ५० लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत व त्यांचे शुक्रवारी जुझे मारिया मिरांडा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, अशी माहिती नगरसेवक नाईक यांनी दिली.

काहीजणांकडून विरोध

एसटी निधीतून आपल्या प्रभागात झालेल्या विकासकामांमुळे काहींना पोटदुखी झाली आणि ही कामे होऊ नयेत म्हणून अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आमचे आमदार सरदेसाई यांनी या विकासकामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले. त्याबद्दल आम्ही सरदेसाई यांचे आभार मानतो, असे नगरसेवक रवींद्र ऊर्फ राजू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT