Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

शाळेतून घेऊन यायला ज्याला सांगितले त्यानेच घात केला; फातोर्ड्यात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, झारखंडच्या एकाला अटक

Fatorda sexual assault: पीडितांमध्ये एक १० ते दुसरी मुलगी ८ वर्षांची आहे. यापूर्वी देखील त्यांने पीडितांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

Pramod Yadav

मडगाव: फातोर्डा येथे दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी झारखंडच्या एकाला अटक करण्यात आली आहे. संशयिताला मुलींना शाळेतून घेऊन येण्यास सांगितले होते. दरम्यान, याचवेळी त्याने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताविरोधात पोक्सो आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चंदू सोरेन (रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या पालकांनी चंद्रूला मुलींना शाळेतून घेऊन येण्यास सांगितले होते. याच काळात त्याने पीडितांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडितांमध्ये एक १० ते दुसरी मुलगी ८ वर्षांची आहे. यापूर्वी देखील त्यांने पीडितांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करत संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT