Gun Dainik Gomantak
गोवा

Crime News : नेसाय गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : प्रतिमा कुतिन्हो

याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात होत असलेल्या या प्रकरणात तातडीने लक्ष घालून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे .

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : फातोर्डा, नेसाय येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा समाजसेविका प्रतिमा कुतिन्हो यांनी निषेध केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात होत असलेल्या या प्रकरणात तातडीने लक्ष घालून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे .

याविषयावर प्रतिमा कुतिन्हो यांनी नेसाय येथे जाऊन गोळीबार झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान बुधवारी रात्री घडलेला प्रकार या कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर कथन केला.

यानंतर प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, येथील कायदासुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. या गोळीबारातून हे कुटुंब सुदैवाने बचावले आहे. अशी घटना ओल्ड मार्केट परिसरातही काही दिवसांपूर्वी घडली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गोव्याचे ‘शूटिंग डेस्टिनेशन’मध्ये रूपांतर करत आहे का?

मडगाव येथील गोळीबाराच्या घटनेनंतर काही दिवसांतच नेसाय येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे दिसून येते.

गोमंतकीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT