Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

Extortion Case in Fatorda: २०१७ साली तिरुपती याच्या संपर्कात आलो. तो लेबर कंत्राटदार असून त्याने आपल्‍या एका अपार्टमेंटचे काम केले होते. नंतर बाणावली येथे व्‍हिलाचे काम केले होते.

Sameer Panditrao

मडगाव: ‘वॉल्टर’ नावाच्या इसमाचा धाक दाखवून एका रियल इस्टेट व्यावसायिकाला धमकावून दोन कोटींची खंडणी मागण्याची घटना फातोर्ड्यात घडली. या प्रकरणी श्रीनिवास थोरवत यांनी तिरुपती वारकुरी व अन्य अज्ञात संशयितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

२०१७ साली आपण तिरुपती याच्या संपर्कात आलो. तो लेबर कंत्राटदार असून त्याने आपल्‍या एका अपार्टमेंटचे काम केले होते. नंतर बाणावली येथे व्‍हिलाचे काम केले होते. तिरुपतीने बेस किमतीत व्‍हिला  द्या, असे मला सांगितले होते.

तसेच बेळगाव येथे फ्लॅटची मागणी केली होती. मात्र त्‍यास आपण नकार दिला होता, असे श्रीनिवास थोरवत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

हल्लीच नजीर शेख याने ‘आपल्याला तुला भेटायचे आहे, तिरुपतीही सोबत असेल’ असे सांगितले होते. शेख हा आपल्‍या ओळखीचा होता. त्यानुसार आपण घोगळ येथील चौगुले महाविद्यालयानजीकच्‍या सिटी सेंटर कॅफेमध्ये गेलो. त्यावेळी तिरुपती, शेख व अन्य चौघे तेथे होते. ‘‘आम्ही वॉल्टरची माणसे आहोत.

सर्व राजकारणी व पोलिस त्याच्या खिशात आहेत. पोलिस तक्रार केल्यास काहीच साध्य होणार नाही. तुमच्या सर्व हालचालींवर आमची पाळत आहे. मुलांना शाळेत ने-आण करतानाही आम्ही तुमच्या पाळतीवर असतो. बऱ्या बोलाने दोन कोटी रुपये द्या’’ अशी धमकी संशयितांनी दिली असे श्रीनिवास यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT