Tragic Death Dainik Gomantak
गोवा

Fatorda: हृदयद्रावक! बेडरूमचे दार लावले, बाल्कनीतून घेतली उडी; फातोर्ड्यात 73 वर्षीय वृद्धाने संपवले जीवन

Fatorda Death Case: जोस फोन्सेका असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: चंद्रवाडा–फातोर्डा परिसरात शनिवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारून ७३ वर्षीय वृद्धाने जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. जोस फोन्सेका असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोस फोन्सेका हे मागील एक वर्षापासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. ते आपल्या पत्नीसोबत चंद्रवाडा–फातोर्डा येथील निवासस्थानी राहत होते. शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांनी बेडरूमला आतून कडी लावली. त्यानंतर बाल्कनीतून खाली उडी घेतली.

या घटनेत फोन्सेका गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुखदा प्रभुदेसाई या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT