Father Philip Neri Ferrao appointed as Cardinal Dainik Gomantak
गोवा

फादर फिलीप नेरी फेर्रांव यांची कार्डिनलपदी नियुक्ती

27 ऑगस्ट रोजी पदभार : गोवा चर्चमधून बहुमान मिळवणारे पहिले गोमंतकीय

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा आणि दमणचे आर्चबिशप फा. फिलीप नेरी फेर्रांव यांची कार्डिनलपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी केली असून गोवा चर्चसाठी हा मोठा बहुमान मानला जात आहे. गोवा चर्चमधून कार्डिनल हा बहुमान मिळवणारे ते पहिलेच गोमंतकीय आहेत. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ही घोषणा केली. त्यांनी 21 नवे कार्डिनल नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून त्यांना 27 ऑगस्ट रोजी पदभार देण्यात येणार आहे. या नव्या 21 कार्डिनलमध्ये हैदराबादचे आर्चबिशप ॲन्थनी पुला यांचाही समावेश आहे. (Father Philip Neri Ferrao appointed as Cardinal)

यापूर्वी मूळ गोमंतकीय असलेल्या आर्चबिशपना कार्डिनलपद मिळाले असले तरी ते दुसऱ्या डायोसेजनशी संबंधित होते. फा. फेर्राव हे गोवा डायोसेजनमधून झालेले पहिलेच कार्डिनल आहेत. फा. फेर्राव हे सध्या अखिल भारतीय आर्चबिशप संघटनेचे अध्यक्ष असून त्यांची कार्डिनलपदी झालेली नियुक्ती त्यांच्या शिरपेचात खोवलेला आणखी एक मानाचा तुरा समजला जात आहे.

कार्डिनल यांची नियुक्ती थेट पोप करतात आणि त्यांचा पोप कार्यालयाशी थेट संबंध असतो. नवीन पोपची नियुक्ती याच कार्डिनलमधून केली जाते आणि त्या निवडीत हेच कार्डिनल मंडळ मतदान करते.

सध्या या कार्डिनल मंडळात 208 कार्डिनल असून त्यापैकी 117 जणांना मतदानाचा अधिकार आहे. आता या मंडळात आणखी 21 कार्डिनलांची भरती होणार असल्याने ही संख्या 229 वर पोहोचणार आहे. त्यातील 131 जणांना मतदानाचा अधिकार असेल. नवे जे 21 कार्डिनल नियुक्त केले जात आहेत, त्यात फा. फेर्राव यांची ‘धर्मशास्त्राचे प्रगाढ ज्ञान असलेले धर्मपंडित’, अशी ओळख आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात त्यांना आदराचे स्थान आहे. त्याचमुळे त्यांची नियुक्ती अखिल भारतीय बिशप परिषदेचे अध्यक्ष म्हणून केली असून संपूर्ण देशातील बिशपांचे ते नेतृत्व करत आहेत.

कार्डिनलच्या जबाबदाऱ्या : कॅथलिक चर्चमध्ये ‘कार्डिनल’ पदाला मोठे स्थान आहे. याच कार्डिनलमधून एकाची निवड पोपपदी केली जाते. ही कार्डिनल परिषदच पोपची निवड करते. कार्डिनल हे पोप कार्यालयाशी थेट जोडलेले असतात आणि पोपचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यांची नियुक्ती थेट रोममधील पोप कार्यालयात केली जाते किंवा कुठल्याही प्रांताची जबाबदारी पोप त्यांच्याकडे सोपवू शकतात.

गोव्याचे आर्चबिशप फा. फिलिप नेरी फेर्रांव यांना कार्डिनल पदाचा बहुमान मिळणे, ही गोव्याचे चर्च आणि संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या दिवसाची नोंद सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे. या गोष्टीचा आम्हाला अतीव आनंद होत आहे. यामुळे गोवा चर्चच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. - फा. व्हिक्टर फेर्रांव

गोवा आणि दमणचे आर्चबिशप फा. फिलीप नेरी फेर्राव यांची कार्डिनलपदी नियुक्ती केल्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी केली आहे. याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करत आहे. त्यांची ही निवड गोव्यासाठी मोठा बहुमान आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT