मडगावमधील न्यू मार्केटची दुरवस्था; व्यापारी त्रस्त

शेडशी संबंधित आमची मागणी मडगाव नगरपालिकेकडे अजूनही प्रलंबित आहे : व्यापारी
Margao New Market News
Margao New Market NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव नगरपालिकेने न्यू मार्केटकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. शेड, अतिक्रमण आणि पार्किंगचे प्रश्न सोडवण्यात पालिका अपयशी ठरल्याचे येथील व्यापाऱ्यांचा दावा आहे. परिणामी मार्केटची अवस्था दयनीय झाली आहे. (Margao new market in poor condition)

Margao New Market News
गोव्यात इलेक्ट्रिक बसचं तिकीट जास्त; प्रवाशांमध्ये नाराजी

"शेडशी संबंधित आमची मागणी मडगाव नगरपालिकेकडे अजूनही प्रलंबित आहे. शेडच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे निधी नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. अनेक वेळा विनंती करूनही विक्रेत्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही", असे न्यू मार्केट व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले.

काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मार्केटच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी जागाच शिल्लक नाही, असा दावा येथील लोकांनी केला आहे. गटारांची दुरुस्ती न केल्याने पावसाळ्यात येथे पाणी तुंबण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नगरपालिकेने पावसाळा सुरू होण्याआधी या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी व्यापाऱ्यांनी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com