Island Accident Dainik Gomantak
गोवा

Jacinto Island Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार

सेंट जॅसिंतो बेटावरील अपघातात दुचाकी, कारचे मोठे नुकसान

दैनिक गोमंतक

आज सकाळी सेंट जॅसिंतो बेटावर अपघात झाला आहे. या अपघातात चिखली येथील 40 वर्षीय रीना गोन्साल्विस हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा पुतणा वेलीन गोन्साल्विस या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आज दुपारी पावणे दोन वाजता चिखली क्रॉस जवळ ही घटना घडली.

(Fatal accident reported at St Jacinto Island four wheeler rams into two-wheeler one dies on the spot)

मिळालेल्या माहितीनुसार वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक रीना गोन्साल्विस ही महिला जागीच ठार झाली. तर तिच्या मागे बसलेला तिचा पुतणा वेलीन गोन्साल्विस (वय 17 ) हा गंभीर जखमी झाला.

वेलीन याला तातडीने चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात हलविण्यात आले. या धडकेत दुचाकीचा दर्शनी भागाचा चूराडा झाला. मयत महिला व तिचा पूतणा एमईएस कॉलेजमधून चिखली येथे पंचायती जवळ घरी येत होते.

दरम्यान अधिक माहिती मिळालेल्यानुसार अर्टिका मधील तिन मूलगे व 2 मुली वास्को येथे भ्रमंतीसाठी आले होते. हे सगळे म्हापसा येथील असून वास्को पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. वास्को पोलिस, पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT