Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बेतोडा येथे दुचाकीचा तर ढवळी येथे दोन चारचाकींचा अपघात; एकाचा मृत्यु

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे बेतोडा येथे अपघात झाल्याचा आरोप

Rajat Sawant

राज्यात सोमवारी दोन अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहेत. पहिला अपघात हा बेतोडा येथील बगल रस्त्यावर झाला. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात ढवळी येथे कार व पीकअप या दोन वाहनांमध्ये झाला. यात दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेतोडा येथील बगल रस्त्यावर उभी करुन ठेवलेल्या हिताची मशीनवर दुचाकीची धडक बसली. या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री 9.30च्या सुमारास घडला.

आशीष नाईक (24 रा. बेतोडा) असे मृत युवकाचे नाव आहे. ही हिताची मशीन रस्त्याच्या कडेला होती. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दुसरा अपघात हा ढवळी येथे झाला. कार व पीकअप या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात यश पालयेकर (18, फोंडा), सिध्दी नाईक (19, कुडेचडे) जखमी झाले आहेत.

जखमींना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT