Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Taleigao Accident Death : भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; कारचालक महिलेची चूक असल्याचा प्राथमिक अंदाज

ताळगावमधील अपघातात एक 46 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Kavya Powar

Goa Accident Case : गोव्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नाही. दिवसेंदिवस यात नवनवीन घटनांची वाढ होत आहे. या घटना होऊ नयेत यासाठी गोवा वाहतूक पोलीस आणि सरकार सतर्क आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ताळगावमधील अपघातात एक 46 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ताळगावमध्ये एका दुचाकी आणि कारमध्ये जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही गाड्यांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. यात दुचाकीस्वार अब्दुल ताहिर खान (46) यांना जबर मार लागला आणि त्यांना इस्पितळात नेत असताना त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्व परिसर हादरून गेला आहे.

दरम्यान, कारचालक महिला असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी ही महिला अतिशय बेदरकारपणे कार चालवत असल्याचे सांगितले आहे. आणि त्यामुळेच हा अपघात घडला असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

अपघातात मृत झालेले अब्दुल खान यांच्या कुटुंबाने या प्रकरणात कारचालक महिलेने मद्यप्राशन केले होते का याची चाचणी करण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पर्वरी सुकूर भागात शुक्रवारी रात्री एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झालेल्या ट्रकला समोरुन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने पर्वरीत काल रात्रीपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातात कुणालाही इजा झाली नसली तरी ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT