Premanand Naik hunger strike Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: 'भूतानी'विरोधात स्थानिक आक्रमक; उपोषणाचा आज तिसरा दिवस, आंदोलन चिघळणार?

Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ पंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये होऊ घातलेल्या वादग्रस्त ‘भूतानी’ प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना रद्द किंवा मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार, असे सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी आज स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Infra Project Sancoale Premanad Naik Hunger Strike Against Permission

कुठ्ठाळी: सांकवाळ पंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये होऊ घातलेल्या वादग्रस्त ‘भूतानी’ प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना रद्द किंवा मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार, असे सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी आज स्पष्ट केले. ते २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यानंतर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

मंगळवारी प्रमोनंद नाईक यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सांकवाळ पंचायतीचे सत्ताधारी पंचसदस्य भूतानी प्रकल्पाविषयी दुहेरी भूमिका घेत असून सत्ताधारी पंचसदस्य पूर्णपणे भ्रष्टाचारी झाल्याचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी सांगितले.

प्रेमानंद नाईक यांच्या म्हणण्यानुसार, खुद्द भूतानी कंपनीने कारणे दाखवा नोटिसीला दिलेल्या उत्तरात आमचे कोणतेच परवाने नाहीत. यासाठीच पंचायतीने आमच्याकडून पैसे उकळलेले आहेत. असे असताना पंचायत परवाना रद्द का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोवा

यावेळी प्रेमानंद नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी पंच तुळशीदास नाईक, पीटर डिसोझा, दामोदर नाईक, पावलो डिसोझा, रमाकांत नाईक, दामू नाईक उपस्थित होते. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनीही भेट देऊन प्रेमानंद नाईक यांना समर्थन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT