E-Nam Portal Dainik Gomantak
गोवा

E-Nam Portal: शेतकऱ्यांना ‘ई-नाम’द्वारे जोडणार! उत्तराखंडचे कृषीमंत्री गणेश जोशींची घोषणा

बाणावलीत राष्ट्रीय कृषी परिषदेचे उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक

E-Nam Portal: भारतातील सर्व राज्य कृषि विपणन मंडळाचा महासंघ म्हणून देशात कार्यरत असलेल्या कोसंब (राष्ट्रीय कृषी विपणन मंडळ) या संस्थेच्या राष्ट्रीय कृषी परिषदेचे उद्‍घाटन आज बाणावली येथील एका हॉटेलात झाले.

या परिषदेत गोव्यासह हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखांड, तेलंगणा, सिक्कीम, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड या राज्यातील कृषी विपणन मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. देशातील सर्व कृषी बाजार तसेच शेतकऱ्यांना ‘ई-नाम’ पोर्टल द्वारे जोडणार, अशी घोषणा ‘कोसंब’चे अध्यक्ष तथा उत्तराखंडचे कृषी मंत्री गणेश जोशी यांनी आज घोषणा केली.

या ई- नाम पोर्टल द्वारे देशातील कुठलाही शेतकरी आपला शेतीमाल देशातील कुठल्याही मंडी(बाजार)मध्ये पाठवू शकणार आहे. शिवाय त्याला योग्य भावही मिळणार आहे. देशातील १५३८ कृषी बाजार या पोर्टलला जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांना या पोर्टलबद्दलची माहिती देण्यासाठी परिषदा, शिबिरे आयोजित करण्यात येतात,असेही जोशी म्हणाले.

सध्या देशात सेंद्रीय कृषी उत्पादन २५ टक्क्यांवर आहे, ते ६० टक्क्यांवर नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोसंब’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे. एस. यादव यांनी सांगितले की, या परिषदेत कृषी उत्पादन व विक्री संदर्भात ज्या सुधारणा सुचवल्या जातील, किंवा शिफारसी केल्या जातील त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविल्या जातील. केंद्र सरकार त्यावर अभ्यास करून देशभर त्याची अंमलबजावणी करेल.

गोवा कृषि उत्पन्न आणि पशुधन विपणनाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी स्वागत केले. राष्ट्रीय परिषदेत एसएफएसी, केंद्र सरकारचे डॉ. मनोज द्विवेदी, नागार्जुन फर्टीलायझरचे डॉ. दुश्यंत, डॉ. पराशराम पाटील हे ई-नाम पोर्टल बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. प्रेमानंद म्हांब्रे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Attack: पोलिसांवरील हल्ल्यामुळे काँग्रेसला चिंता, कारवाईची मागणी; मुरगाव पोलिस उपअधीक्षकांची घेतली भेट

Goa Crime: 'सोशल मीडिया'वरील मैत्री पडली महागात, आजारपणाच्या बहाण्याने 90 लाखांचा गंडा नंतर अत्याचार, आरोपी गजाआड

Goa Highways Development: महामार्गांवर तीन वर्षांत 2,320 कोटी खर्च, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचे माजी आमदार 'आप'च्या संपर्कात?

Digambar Kamat Ramesh Tawadkar Oath: दिगंबर कामतांना देव पावला, रमेश तवडकरांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ; आता खाती कोणती मिळणार याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT