Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : सुभाष शिरोडकर

निरंकाल-बेतोडा येथील श्री गणनाथ देवस्थानच्या सभागृहात बुधवारी ८ रोजी शिरोडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या भाजप किसान मोर्चा संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मंत्री शिरोडकर बोलत होते.

दैनिक गोमन्तक

शिरोडा : शिरोडा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादनात यश मिळवावे. कृषीखात्यातर्फे देण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा उठवून शेती, बागायतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावे. यातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच घेतलेले उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध करावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

निरंकाल-बेतोडा येथील श्री गणनाथ देवस्थानच्या सभागृहात बुधवारी ८ रोजी शिरोडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या भाजप किसान मोर्चा संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मंत्री शिरोडकर बोलत होते. यावेळी अखिल गोवा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, माजी खासदार ॲड नरेंद्र सावईकर, कृषीखात्याचे अधिकारी नितीन बोरकर, नागेश कोमरपंत उपस्थित होते.

ॲड. सावईकर म्हणाले, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या आहेत. त्यांचा शेतकरीवर्गाने फायदा उठवून कृषी उत्पादन वाढवून राज्याचे नाव मोठे करावे.

वासु गावकर यांनी शिरोडा मतदारसंघ हा कृषी प्रधान असल्याचे सांगून सर्व शेतकऱ्यांनी पडिक जमीन लागवडीखाली आणण्याचे आवाहन केले. कृषीखात्याचे अधिकारी नितीन बोरकर, नागेश कोमरपंत यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदारसंघातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना आंबा रोपटी, कवाथे, बि-बियाणे, वितरित केली. शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक यांनी स्वागत केले. अवधुत नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT