IIT Goa Protest in Sanguem  Dainik Gomantak
गोवा

IIT Goa Protest : सांगेत सरकारची दडपशाही; आंदोलक शेतकऱ्यांवर पलटवार

‘आयआयटी’ला विरोध करणाऱ्या आंदोलकांपैकी एकाला अटक; प्रकल्पस्थळी संचारबंदीचं 144 कलम लागू

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa Protest : सांगे येथील प्रस्तावित आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाविरोधात चौथ्या दिवशीही आंदोलन करण्यात आले. सर्व्हेक्षणाला विरोध केलेल्यांना समन्स पाठविण्यात आले असून चारपैकी एका आंदोलकाला काल मंगळवारी अटक झाली. या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी सायंकाळी उशिरा या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध मंगळवारीही संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरूच ठेवले. सर्व्हे अधिकारी येणार म्हणून कोटार्लीत शेतकरी महिला रस्त्यावर ठाण मांडून होत्या. अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी पोलिसांच्या उपस्थितीत शिल्लक राहिलेले सहाही ‘सर्व्हे पॉईंट’ पूर्ण केल्याने आयआयटीचे सर्व्हेक्षण काम पूर्ण झाले आहे. मात्र, कालही सर्व्हे अधिकारी येतील, म्हणून शेतकरी रस्ता अडवून होते. तर दुसरीकडे पूर्वीची परिस्थिती पाहून पोलिस पथक सांगे आणि आयआयटी भागात गस्तीवर तैनात होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 144 कलमाखाली जारी केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेपासून 200 मीटर अंतरात पाच व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्तींच्या संचारावर बंदी आणली आहे. या परिसरात सभा घेण्यास किंवा निदर्शने करण्यास मनाई आहे.

प्रकल्पावरून शेतकऱ्यांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण

प्रशासन, सरकार आणि स्थानिक शेतकरी या दोन्हीही बाजूने संबंध ताणले गेल्याने कोणीही कोणाचे म्हणणे जाणून घेण्याच्या मनस्थितीत नाही. परिणाम म्हणून शेतकरी आपल्या पद्धतीने विरोध करीत आहे, तर प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत आहे. यातून आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरपकड सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात भीती, संताप व्यक्त होत आहे.

आंदोलन कायम

शेतकरी आंदोलकांना धरपकड सुरू केल्याने सांगेत वातावरण तंग बनले आहे. शेतकरी पुढील कृती कोणती करणार? याबाबत पोलिसही साशंक आहे. आंदोलनात महिलाही सहभागी होत आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत महिलांनी आंदोलन केले. हे आंदोलन पुढेही सुरूच राहील, आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धारही आंदोलकांनी केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

जोसेफ फर्नांडिसवर कारवाई

सर्व्हेला अडथळा निर्माण केल्याने सांगे पोलिसांनी चार शेतकऱ्यांना समन्स बजाविले. यापैकी जोसेफ फर्नांडिस रा. दांडो यांना अटक झाली आहे. तर फिलिप्स वाझ, स्वीझल क्रूज, मारिया वाझ (सर्व रा.दांडो) यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अटकेच्या कारवाईनंतर सांगेत वातावरण तापले असून संतप्त महिलांंनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

सांगेत पुन्हा तणाव

कोटार्ली सांगे येथे प्रकल्प उभा होत आहे. तेथील जागेचे सिमांकन करण्यासाठी सोमवारी अधिकारी आल्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना अडविले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर झटापट होऊन वाद झाला. आज या प्रकरणी एका आंदोलकाला अटक केल्यावर सांगे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता.

बागायतींचे काय?

प्रकल्पासाठी शेतकरी जमिनी देण्यासाठी राजी नाहीत. दुसऱ्या बाजूने सरकार कुणाच्या जमिनी जात असल्यास कागदोपत्री दाखले सादर करण्याचे आवाहन करीत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ज्यांनी बागायती उभ्या केल्या त्या शेतकऱ्यांत चलबिचलता निर्माण झाली आहे. आता आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने पुढील परिस्थिती काय असेल, हे अनिश्‍चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT