Goa mining Dainik Gomantak
गोवा

भरपाई मिळेपर्यंत खनिज वाहतूक रोखण्याचा इशारा

मयेतील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दैनिक गोमन्तक

डिचोली : खाण कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली लढा देणारे खाणग्रस्त मये गावातील शेतकरी पुन्हा एकदा एकवटले आहेत. संबंधित खाण कंपन्यांनी थकीत नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत यापुढे खनिज वाहतूक करण्यास देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. (Goa mining News Updates)

अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड जतीन नाईक आणि व्हिक्टर ब्रागांझा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मयेतील शेतकऱ्यांनी (Farmer) डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चौगुले आणि वेदांता कंपनीकडून मयेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित खाण कंपनींकडून गेल्या सहा वर्षांपासूनची (2014 ते 2019) नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी किसान सभेच्या बॅनरखाली मयेतील शेतकरी संघर्ष करत आहेत.

आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर रोजी डिचोलीत (Bicholim) भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून पैरा येथील चौगुलेच्या खाणीवरून ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरु आहे. यामुळे अस्वस्थ बनलेले शेतकरी नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पुन्हा एकत्रित आले आहेत.

खनिज वाहतूक बेकायदा
पैरा येथील चौगुलेच्या खाणीवरुन (Mining) होणारी ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक पूर्णपणे बेकायदा आहे. असे भारतीय किसान सभेचे नेते कॉम्रेड जतीन नाईक यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तोपर्यंत खनिजाची वाहतूक करण्यास देणार नाही. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांविरोधातही दाद मागण्यात येईल, असा इशाराही जतीन नाईक यांनी दिला आहे.

...तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार
थकीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेमार्फत डिचोलीच्या मामलेदारांकडे खटला चालू आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभा मयेचे अध्यक्ष कृष्णा गडेकर यांनी दिली. नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT