Mopa Water Issue  Dainik Gomantak
गोवा

Mopa: ‘मोपा’ वरील पाण्याने शेतीचे मोठे नुकसान; निगळ्ये पोरस्कडे, चांदेल, हसापूर भागातील शेतकरी त्रस्त

Mopa Water Issue: दरवर्षी सरकार नुकसान भरपाई देण्याची घोषणा करते, परंतु अंमलबजावणी मात्र होत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: पेडणे तालुक्यातील मोपा परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला. या प्रकल्पामुळे तालुक्याचा विकास होईल, अशी आजही अपेक्षा आहे. परंतु या विमानतळामुळे या पठारावरील जे डोंगर माळरानावरून येणारे पाणी थेट पाणी निगळ्ये पोरस्कडे, चांदेल, हसापूर या परिसरात सोडले जाते. परिणामी मोठ्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी सरकार नुकसान भरपाई देण्याची घोषणा करते, परंतु अंमलबजावणी मात्र होत नाही.

मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्यातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी शेतजमिनींचा त्याग केलेला आहे. त्यांना समाधानकारक मोबदला अजूनही मिळालेला नाही. विमानतळावर निर्माण होणारे रोजगार, वेगवेगळे व्यवसाय त्यातही प्रकल्पपीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अजून संधी मिळत नाही. लोकप्रतिनिधी आपल्या पद्धतीने काम करतात, परंतु कंपनी मात्र मनमानी पद्धतीने काम करत आहे. एकूण ४० हेक्टर शेत जमीन त्यातील भात शेती वाया गेली आहे. सरकारने चतुर्थी पूर्वी नुकसान भरपाई देऊ, अशी घोषणा केली आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर स्थानिक पंचायत मंडळ शेतकऱ्यांनी कंपनी बरोबर चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु आज पर्यंत तसा उपाययोजनेसाठी कोणतीही पावले उचललेली दिसत नाहीत.

उदय महाले, सामाजिक कार्यकर्ते

मोपा विमानतळावरील संपूर्ण पाणी मोठया प्रमाणात पोरस्कडे निगळे गावात येत असून यांच्या वर दुर्लक्ष केल्यास पुढील पिढीला याचा त्रास भोगावा लागेल. हे मोपा विमनतळावर असेच चालू राहिल्यास काही वर्षांनी त्या भागातील घरे धोकादायक म्हणून घोषित करून, ती घरे पाडावयास काढतील. व शेत जमीन ओसाड पडून आहे म्हणून सरकार ताबा मिळवेल. आत्ताच ‘जीएमआर’ ला आणि नागरी उड्डाण खात्याला धारेवर धरावे.

भारत बागकर, सामाजिक कार्यकर्ते

मोपा विमानतळामुळे संपूर्ण परसराचे सर्व बाजूने न भरून येणारे नुकसान झाले आहे,याबद्दल सरकार थोडेही गंभीर नाही. मोपा विमानतळावर काँक्रिट चे साम्राज्य उभे झाले आहे. मातीच दिसत नाही. पावसाचे पाणी तिथे इंच भरही जिरत नाही, मग जाणार कुठे? मग मिळेल त्या बाजूने सखल भागात हे पाणी शिरते. निगळ्येतही लोकांच्या शेतात, घरांत, हे पाणी घुसून नुकसान करीत आहे. कुणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी, अशी स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT