Borim Bridge Meeting Dainik Gomantak
गोवा

New Borim Bridge: शेतकऱ्यांनाही नव्या पुलाची आवश्यकता!

Alex Sequeira: पुलासाठी कुणाची जागा संपादित करायची यासाठी शेतकऱ्यांत गुंता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

नवा बोरी पूल ही काळाची गरज आहे. सरकार जुना पूल पडेपर्यंत थांबू शकत नाही. त्याचसाठी सरकार नव्या पुलासाठी आग्रही आहे. आपण शेतकऱ्यांशीही बोललो आहे.

त्यांनाही नव्या बोरी पुलाची आवश्यकता आहे, हे माहीत आहे. मात्र प्रश्र्न आहे तो भू संपादनाचा. पुलासाठी कुणाची जागा संपादित करायची यासाठी शेतकऱ्यांत गुंता आहे, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यानी आज मडगावात पत्रकारांना सांगितले.

आज जिल्हाधिकारी प्रशासन इमारतीच्या सभागृहात आलेक्स सिक्वेरा यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

त्यानी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना रस्ता आखणीचे सात प्रस्ताव ठेवले. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे, त्याचे सर्वेक्षण व पहाणी दोन चार दिवसांपूर्वी झाली आहे. या अहवालाचाही अभ्यास करावा लागेल.

बोरीपुलाबद्दल गडकरींशी बोलणार!

दरम्यान, ११ जुलै रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्यात येणार आहेत. आपण त्यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार आहे व नव्या बोरी पुलासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले. हा नवा पूल बांधताना एकाचेही घर पाडले जाणार नाही किंवा शेत जमिनी नष्ट होऊ देणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही मंत्री सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT