Goa IIT Dainik Gomantak
गोवा

Goa IIT: विरोधात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु

आजच्या परिस्थितीत सांगेला पुरेसे पाणी आणि वीज मिळत नाही.

दैनिक गोमन्तक

Sangeum: चार दिवसांच्या शांततेनंतर सांगेतील आयआयटी विरोधक शेतकऱ्यांनी दांडो-सांगे येथील शेतकऱ्याच्या दारातच धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. या आंदोलनात पन्नासपेक्षा अधिक शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या.

शेतकरी आंदोलक महिला लुईझिना ओलिव्हर म्हणाल्या की, आजच्या परिस्थितीत सांगेला पुरेसे पाणी आणि वीज मिळत नाही. अशा परिस्थितीत आयआयटी प्रकल्प साकारल्यास सांगेवासीयांची काय परिस्थिती होणार, याचा विचार जनतेने करावा. सांगेचा निसर्ग आणि शेतीभाती नष्ट करून काँक्रिटची जंगले उभारायची काय. यातून फायदा कोणाचा होणार ते गुलदस्त्यातच आहे.

मिल्टन फर्नांडिस यांनी सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी आमच्या शेतजमिनीसभोवताली 144 कलम लावले आहे. या दबावतंत्राचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला विरोध दर्शविण्यासाठी खुद्द शेतकऱ्याच्या दारात बसून धरणे आंदोलन सुरू करावे लागले आहे. आ

मचा आयआयटीला विरोध नाही: पण आमच्या जमिनी हिरावून असला प्रकल्प मुळीच नको, असे सांगितले. आज आमच्यासोबत सर्व शेतकरी आहेत म्हणून त्यांच्यात फूट घालण्याचा बनाव केला जात आहे. काही शेतकरी या बनावाला बळी पडतील; पण सर्वच शेतकऱ्यांना फसविणे शक्य होणार नाही. म्हणून साखळी पद्धतीने धरणे आंदोलनात शेतकरी वर्ग सहभागी झाला असल्याचे मिल्टन फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

SCROLL FOR NEXT