Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Digambar Kamat : फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Farmagudhi Bhoma Road Work : फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दिली. बांदोडा येथील ‘अंडरपास’च्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना दिगंबर कामत यांनी राज्यातील सर्व रस्ते चकाचक करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

ज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडाचे सरपंच रामचंद्र नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता दत्तप्रसाद कामत तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांदोड्यातील या अंडरपासमुळे स्थानिकांची सोय झाली असून स्थानिक आमदाराच्या पुढाकाराने विकासकामे झाल्याचे दिगंबर कामत यांनी नमूद केले व पुढील कामे साबांखामार्फत करण्याची ग्वाही दिली. या कामामुळे स्थानिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, बांदोड्यातील या अंडरपासची फार मोठी गरज निर्माण होती. खांडेपार येथील नवीन पुलाच्या बांधकामावेळी कुर्टी-शापूर-बांदोडा येथील अंडरपासला पुरातत्व खात्याने विरोध केल्यानंतर हे काम अडून राहिले होते; पण आता नियोजित कामापासून जरा पुढे हे काम केले अाहे. माजी सरपंच राजेश नाईक यांनी तसेच स्थानिकांनी या अंडरपासची मागणी करीत आंदोलनही केले होते, त्यामुळे स्थानिकांची गरज लक्षात घेऊन हे काम पूर्णत्वास आले आहे.

याशिवाय, फर्मागुढी ते भोम या चौपदरी रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटेल. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फोंडा, कुर्टी, बांदोडा तसेच भोम परिसरातील नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.

भोमवरून उड्डाणपूल निश्‍चित!

फर्मागुढी ते भोमपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून भोम येथून गावातून जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामावेळी येथील वाहतूक चौपदरी रस्त्यावरून नेण्यात येणार आहे. भोम येथील बांंधकामावेळी मंदिरे तसेच घरे सुरक्षित राहणार असल्याची ग्वाही मुख्य अभियंता दत्तप्रसाद कामत यांनी दिली.

जरा कळ सोसा...

फर्मागुढी येथील चौपदरी रस्त्याचे काम करताना फर्मागुढी परिसरात वाहतुकीला थोडा त्रास होणार आहे. फर्मागुढी येथे उड्डाणपूल उभारून हा चौपदरी रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. जीव्हीएम सर्कलपासून ते फार्मसी महाविद्यालयापर्यंत हे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे थोडी कळ सोसा; एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडूनच वीज खात्याला कानपिचक्या; कारभारावर ताशेरे,जनजागृती न केल्याचा ठपका

कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन'! मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष

उड्डाणपुलाच्या कामामुळे जुने गोवे-गवंडाळी मार्गावर 31 डिसेंबरपर्यंत वाहतूक बंद, अधिसूचना जारी; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Goa Recruitment: जीपीएससी भरती होणार ऑनलाईन; गैरप्रकारांना बसणार आळा, एकाच डिजिटल व्यासपीठावरून भरती

Amazon Insults Aryabhata: ॲमेझॉनच्या जाहिरातीवरून नवा वाद; 'आर्यभटांचा अवमान' केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नेटकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT