Farhan Azmi Goa Issue Dainik Gomantak
गोवा

Farhan Azmi: 'गोव्यात महाराष्ट्र द्वेषाने टोक गाठलंय'; पतीसाठी मैदानात उतरली बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकिया Video

Abu Farhan Azmi Viral Video Goa: हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आयेशा टाकिया हिने पतीचे समर्थन करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Akshata Chhatre

कळंगुट: मुघल बादशाह औरंगजेब यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमीच नाही तर त्यांचा मुलगा फरहान आझमी हा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ईंडिकेटर न दाखवता गाडी वळवल्याने कांदोळी परिसरात मोठा वादंग निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार फरहान आझमी याने बंदुकीचा धाक दाखवल्याने हे प्रकरण आणखीन चिघळले आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय. हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आयेशा टाकिया हिने पतीचे समर्थन करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिनेत्री आयेशा टाकिया हिने सोशल मीडियावर पोस्ट करत या वादाला आणखीन वेगळे वळण दिले आहे. पोस्टमध्ये आयेशा म्हणतेय की गोव्यातील गुंडांकरवी रात्रीच्यावेळी तिचा पती फरहान आझमी आणि लेकाला धमक्या देत, हाल करवत त्यांचा छळ करण्यात आला होता.

तासंतास चालेल्या या प्रसंगावर नियंत्रण आणत, मदत मागण्यासाठी फरहानने पोलिसांना फोन केला असताना पोलिसांना देखील या जमावाकडून धाक दाखवण्यात आला.

फरहान आणि त्यांच्या मुलाला केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असल्याने आणि त्यांच्याजवळ महागडी गाडी असल्याने एवढ्या भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं असं ती म्हणालीये. त्या भीषण रात्री मदतीसाठी बोलावलेल्या पोलिसांनीच पती फरहान आझमी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असं म्हणत "आमच्याजवळ याबद्दलचे सर्व पुरावे आहेत, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही याविरुद्ध नक्कीच तक्रार करू" असं अभिनेत्री आयेशा म्हणाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

Omkar Elephant: भल्यामोठ्या 'ओंकार' हत्तीला कसे परतवले सिंधुदुर्गात? पहा Video

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT